वृक्ष जाळण्याच्या घटनात वाढ
By admin | Published: April 26, 2017 12:09 AM2017-04-26T00:09:00+5:302017-04-26T00:09:00+5:30
पाळधी, ता.जामनेर : सध्या शेताच्या बांधावरील केरकचरा साफ करताना वृक्ष जळण्याच्या प्रकारातून अपघात सत्र नित्याचे झाले आहे.
जामनेर : शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागले असून, जमीन पेरणीसाठी तयार करण्याचे काम जोमाने सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून बंधा:यावरील वाळलेले गवत, काडीकचरा जाळून त्याला आग लावून साफसफाई करताना या आगीत अनेक हिरवी डेरेदार झाडे जळून जमीनदोस्त होताना दिसत आहेत. या प्रकारात अलीकडे वाढ झाली आहे.
अनेक शेतक:यांची शेतजमीन ही रस्त्याला लागून आहे. शेताच्या बंधा:याला आग लावून शेतकरी शेतातून निघून जातो. बंधा:यावरील मोठेमोठीे जिवंत झाडे ही धिम्या गतीने तीन ते चार दिवस जळत राहतात. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणारे मोटारसायकल किंवा लहान-मोठय़ा वाहनावर हे झाड पडले तर मोठा अपघात होण्याची शक्यता असते. पहूर-पाळधी रस्त्यावर रात्री जळते झाड दुचाकीवर पडले होते. 17 दिवसांपूर्वी झालेल्या या अपघातात दोन जण ठार झाले होते.
महामार्गावर गेल्या आठवडय़ातसुद्धा पाळधीजवळ दोन वृक्ष विजेच्या खांबावर पेटून पडले. 23 रोजी दुपारी पाळधी-पहूरदरम्यान एका बंधा:यातील कचरा पेटविल्याने अनेक मोठी झाडे पेटली. या वेळी पाळधीचे सरपंच कमलाकर पाटील व सहकारी पहूरहून येत असताना त्यांनी हे पेटलेले वृक्ष पाहिले व गाडी थांबवून बाजूच्या हॉटेलातून पाणी आणून ती झाडे विझविण्याचा प्रय} केला. परंतु ती आग आटोक्यात येत नसल्याने त्यांनी जामनेर पालिकेचा अगिAशमन बोलवून आग आटोक्यात आणली.(वार्ताहर)