शालेय पोषण आहाराच्या चौकशीसाठी पालकमंत्र्यांना साकडे
By Admin | Published: July 6, 2017 03:02 PM2017-07-06T15:02:14+5:302017-07-06T15:02:14+5:30
रस्त्याच्या डांबरीकरणासह नागरिकांनी मांडल्या तक्रारी
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.6- जिल्ह्यातील निकृष्ट पोषण आहाराबाबत सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांनी गुरूवारी संपर्क कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेत दोषींवर कारवाईची मागणी केली आह़े
जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांनी निकृष्ट शालेय पोषण आहाराबाबत यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे तक्रार केली आह़े या तक्रारीची दखल घेत शिक्षणमंत्री तावडे यांनी अधिका:यांना प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याबाबत कळविले होत़े आता रवींद्र शिंदे यांनी पोषण आहाराबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली आह़े निकृष्ट पोषण आहाराचे नमुने घेण्यात आले असून ते अन्न, औषधी व प्रशासन विभाग नाशिक येथे पाठविण्यात आल़े मात्र आतार्पयत कोणतीही कारवाई झालेली नाही़ माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीची पडताळणी केली असता, लाखो रूपयांच्या पुरवठा आदेशांवर कव्हरींग पत्र, दिनांक, संबंधित कार्यालयाचा जावक क्रमांक, ते कोणत्या कार्यालयाला पाठविण्यात आलेले आहे, असा स्पष्ट उल्लेख नाही, यासारख्या गंभीर बाबी आढळून आल्याचे त्यांनी पालकमंत्री पाटील यांना दिलेल्या निवदेनात नमूद आह़े पालकमंत्री पाटील यांनी याबाबत माहिती घेतो व त्याबाबतच्या सूचना संबंधित विभागाला करतो, असे आश्वासन शिंदे यांना दिले आह़े
महामार्ग ते तरसोद रस्त्यांचे डांबरीकरण करावे
तरसोद येथे श्री गणपतीचे जागृत देवस्थान आह़े याठिकाणी भाविकांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत असत़े महामार्ग ते तरसोद गणपती मंदिरापयर्ंतचा रस्त्याची दुरवस्था झाली असून या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी गणपती मंदिर संस्थानच्या पदाधिका:यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आह़े