कोरोनाविषयी अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार - पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:49 PM2020-03-17T12:49:15+5:302020-03-17T12:49:52+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही
जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासन व जिल्हा प्रशासन सवोर्तोपरी प्रयत्न करीत आहे. दरम्यान, सोशलमिडीयासह इतरठिकाणी अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. तसेच शाळा बंद करण्याचे आदेश असतानाही शाळा सुरु केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही पालकमंत्र्यांनी दिली आहे.
कोरोना विषाणू संसगार्बाबत जिल्ह्णात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी अजिंठा शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्याताआली होती.
त्यावेळी त्यांनी माहिती दिली. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील आदी उपस्थित होते.
व्हेंटीलेटर खरेदीसाठी १० लाख
तातडीची परिस्थिती उद्भवल्यास अडचण येवू नये, जिल्ह्णातील नागरिकांना तातडीने उपचार उपलब्ध व्हावेत. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयास व्हेंटीलेटर खरेदीसाठी आमदार निधीतून १० लाख रुपये देण्यात येत असल्याची माहिती ही पालकमंत्र्यांनी दिली.
त्या शाळा बंद ठेवणार
यासह ग्रामीण भागातील ज्या शाळांमध्ये शहरातून शिक्षक जातात अशा शाळाही बंद ठेवण्याचा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.
जिल्हा रुग्णालयात कोरोना कक्ष
कोरोना व्हायरसाचा धोका लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालयात अशा रुग्णांसाठी १० बेड राखून ठेवण्यात आले आहे. तर ५ बेडचा स्वतंत्र कोरोना कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती डॉ. खैरे यांनी दिली. याठिकाणी तातडीच्या उपाय योजना म्हणून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना दिल्यात. कोरोना संदभार्तील उपाययोजनांविषयी पालकमंत्र्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि शासकीय आरोग्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचेकडून माहिती जाणून घेतली.
कोरोनाचा कक्ष स्वतंत्र राहणार
जळगाव : कोरोना कक्ष आहे त्या ठिकाणी अगदी स्वतंत्र ठेवून या ठिकाणी रूग्ण व डॉक्टरांशिवाय कोणालाही परवानगी देऊ नका, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ़अविनाश ढाकणे यांनी सोमवारी दिल्या़ त्यांनी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास या वार्डाची पाहणी केली़ या वार्ड शेजारी असलेल्या महिला वैद्यकीय वार्डाचा दरवाजा बंद करून तो बाहेरील बाजुने सुरू करण्याचे त्यांनी सांगितले़ बाहेरून या वार्डला आयसोलेशन वार्ड नाव देऊन या ठिकाणी रूग्णांच्या नातेवाईकांनाही प्रवेश देऊ नये, असे त्यांनी सांगितले़ यावेळी जिल्हाधिकाºयांनी कोरोना कक्षात दाखल रूग्णांची व कक्षाची पाहणी केली़ े