गुढे येथे ५१ तरुणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 07:38 PM2020-03-30T19:38:38+5:302020-03-30T19:39:35+5:30
कोरोना विषाणूच्या काळात मदतीसाठी येथील तब्बल ५१ तरुणांनी रक्तदान केले.
गुढे, ता.भडगाव : कोरोना विषाणूच्या काळात मदतीसाठी येथील तब्बल ५१ तरुणांनी रक्तदान केले.
गुढे येथील ग्रामस्थ आणि तरुण मित्रांनी २९ रोजी संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात रक्तदान शिबिर रेड प्लस ब्लड बँक, जळगाव, विघ्नहर्ता ब्लड स्टोरेज सेंटर पाचोरा, धनश्री ब्लड लॅब, कोळगाव यांच्या सहकार्याने आयोजित केले. या रक्तदान शिबिरासाठी तब्बल ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून शासनाच्या आवाहनाला एकप्रकारे चांगला प्रतिसाद दिला आहे.
उद्घाटन भाऊसाहेब शिवराम पाटील यांनी केले. यावेळी रक्त संकलनासाठी भरत गायकवाड, कमलेश पाटकरी, ज्ञानेश्वर महाजन तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनुप पाटील, रक्तदाते माजी सैनिक पंढरीनाथ महाजन, विजय महाजन, सैनिक सचिन महाजन, स्वप्नील महाजन, ग्रामस्थ भगवान महाजन, रवींद्र शिंपी, संकेत शिंपी, विजय महाजन, कल्पेश भोकरे, ईश्वर महाजन, शुभम पाटील, शशिकांत महाजन, भूषण महाजन, राहुल महाजन, ज्ञानेश्वर महाजन, गोपाल महाजन, दीपेश सोनवणे, रोशन पवार, सोमनाथ महाजन, राकेश महाजन, अमोल महाजन, विकास महाजन, परवेज मन्यार, शेख चांद मन्यार, भारत महाजन, सोमनाथ सुतार, महेंद्र पाटील, जितेंद्र पाटील, संभाजी पाटील, विजय मोरे, श्रीकांत महाजन, कुणाल पाटील, मनोज महाजन, स्वप्नील महाजन, सोमनाथ महाजन, गोपाल सुतार, विशाल महाजन, हिंमत महाजन, आनंदा महाजन आदी ग्रामस्थांनी रक्तदान करून सहकार्य केले.