Gudi Padwa 2018 : जळगावात गुढीपाडव्याला होणार २५० गृहप्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:02 PM2018-03-17T23:02:31+5:302018-03-17T23:06:59+5:30

बाजारपेठेत चैतन्य

Gudi Padwa will be in 250 houses in Jalgaon | Gudi Padwa 2018 : जळगावात गुढीपाडव्याला होणार २५० गृहप्रवेश

Gudi Padwa 2018 : जळगावात गुढीपाडव्याला होणार २५० गृहप्रवेश

Next
ठळक मुद्देश्रीखंडाला वाढली मागणीआॅफरमुळे ग्राहक आकर्षित

विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १७ - गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दुचाकी व चारचाकी वाहनांसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होत असून पाडव्याच्या दिवशी ९०० दुचाकी, २५० चारचाकींची विक्री होणार असल्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तविला आहे. या सोबतच जवळपास २५० गृहप्रवेश होणार असल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले.
५५० दुचाकींचे बुकिंग
मुहूर्त साधण्यासाठी नोकरवर्गाकडून दुचाकी व चारचाकीची खरेदीसाठी बुकिंग करण्यात आली आहे. शहरातील एकाच दालनात गुढीपाडव्यासाठी ५५० दुचाकींचे बुकिंग झाले असून सर्वच वाहनांची डिलिव्हरी तयार असल्याचे सांगण्यात आले. शहरात एकूण ९०० दुचाकींची विक्री अपेक्षित आहे. शनिवारीदेखील रात्रीपर्यंत गर्दी कायम होती.
२५० चारचाकींची विक्री अपेक्षित
दुचाकीसोबतच चारचाकी वाहनांची विक्रीदेखील तेजीत आहे. व्यापारी, व्यावसायिक व नोकरदार यांच्याकडून चारचाकीच्या खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. शहरातील एकाच शोरुममध्ये शनिवारपर्यंत ३५० चारचाकी वाहनांची बुकिंग करण्यात आले. त्या पैकी १५० वाहनांची डिलिव्हरी तयार असल्याचे सांगण्यात आले. इतर शो रुममध्येही चांगली बुकिंग असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे २५० चारचाकींची विक्री रविवारी होणार आहे.
घर खरेदीत उत्साह
रिअल इस्टेट क्षेत्रात उत्साह वाढला असून घर खरेदीकडे शहरवासीयांचा कल वाढला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरात घरांचे बुकिंग मोठ्या प्रमाणात करण्यात आले असून रविवारी २५० गृह प्रवेश होण्याचा अंदाज आहे. नोटाबंदीनंतर असलेली मंदी आता दूर झाल्याचे चित्र असून नवीन वर्षात चांगली उलाढाल राहण्याचा अंदाज बांधकाम व्यावसायिकांनी वर्तविला आहे. घरांची खरेदी व बुकिंग जोरात सुरू असून नागरिकांकडून वेगवेगळ््या साईटची पाहणी केली जात आहे. बँकांचे व्याजदर कमी झाल्याने त्याचा फायदा घेत जात असल्याचे सांगितले जात आहे.
एसीला सर्वाधिक मागणी
इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारालादेखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. यंदा एसीला सर्वाधिक मागणी असून एलईडी, फ्रीज, वॉशिंगमशीन यांच्या खरेदी व बुकिंगसाठी दोन दिवसांपासूनच गर्दी होत आहे. यामध्ये अनेकांनी शनिवारीदेखील वस्तूंची खरेदी केली.
आॅफरमुळे ग्राहक आकर्षित
ग्राहकांनी दुचाकी खरेदी करावी यासाठी वाहन कंपन्यांनी आकर्षक आॅफर दिल्या आहेत. त्यात वाहनांच्या खरेदीसाठी व्याजदरात सूट, विमा अशा आॅफर दिल्या जात आहे. तर इलेक्ट्रॉनिक बाजारात होम थिएटर यासह दैनंदिन वापरातील वस्तू मोफत असल्याने ग्राहक आकर्षित होत आहे.

घर खरेदीमध्ये यंदा उत्साह असून गुढीपाडव्यासाठी बुकिंगला चांगला प्रतिसाद राहिला. यामध्ये अनेकजण गृहप्रवेशदेखील करतील.
सुमीत मुथा, बांधकाम व्यावसायिक.

घरांच्या बुकिंगसाठी चांगला प्रतिसाद आहे. पाडव्याला अनेक जण खरेदी करतील तर काही गृह प्रवेश करतील.
- श्रीकांत खटोड, बांधकाम व्यावसायिक.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चारचाकींचे ३५० वाहनांचे बुकिंग झाले असून १५० वाहनांची डिलिव्हरी दिली जाणार आहे.
- उज्ज्वला खर्चे, विक्री व्यवस्थापक

दुचाकी खरेदीसाठी मोठा उत्साह असून आमच्याकडे ५५० दुचाकींचे बुकिंग झाले असून सर्व हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहे.
- अमित तिवारी, महाव्यवस्थापक.

Web Title: Gudi Padwa will be in 250 houses in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.