फैजपूर अभियांत्रिकीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 07:57 PM2019-08-23T19:57:45+5:302019-08-23T20:00:40+5:30

स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी, त्यासाठी लागणारी मानसिक, शारीरिक तयारी, ध्येय गाठण्यासाठी सकारात्मक विचार गरजेचा असतो. कृती, सवय, परिणाम ही स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याची त्रिसूत्री आहेत, असे प्रतिपादन बेस एज्युुकेशनचे कार्यकारी संचालक अजय बुटवाणी यांनी केले.

Guidance for Competitive Examination in Faizpur Engineering | फैजपूर अभियांत्रिकीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

फैजपूर अभियांत्रिकीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Next
ठळक मुद्देजे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शनकृती, सवय, परिणाम ही स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याची त्रिसूत्री

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : अनेकांचे स्वप्न सरकारी नोकरी मिळविणे, आय.ए.एस, आय. पी.एस. अधिकारी तसेच उच्च शिक्षणाकरिता प्रवेश मिळविणे हे असते. ते मिळविण्यासाठीची जिद्द, त्यासाठी लागणारे परिश्रम, संयम या गोष्टीही अंगी असणे गरजेचे असते. स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी, त्यासाठी लागणारी मानसिक, शारीरिक तयारी, ध्येय गाठण्यासाठी सकारात्मक विचार गरजेचा असतो. कृती, सवय, परिणाम ही स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याची त्रिसूत्री आहेत, असे प्रतिपादन बेस एज्युुकेशनचे कार्यकारी संचालक अजय बुटवाणी यांनी केले.
जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन करताना बुटवाणी बोलत होते.
उत्तम करियर, चांगली नोकरी, पदव्युत्तर चांगला अभ्यासक्रम, मानसन्मान, प्रतिष्ठा इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्राप्त होते. याकरिता विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करावी लागते. त्यामुळेच स्पर्धा परीक्षांचे आज फार महत्व वाढले आहे आणि यामुळेच स्पर्धा परीक्षांचे तंत्र जे प्राप्त करतील अशा विद्यार्थ्यांना आपले करियर उत्कृष्ट करुन जीवनमान उंचावता येईल.
बऱ्याचदा पदवी परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत सरकारी नोकरी मिळते कशी? त्यासाठी पात्रता कोणती असते? अर्ज कोठे मिळतात? त्यासाठी वेगळा कोर्स करावा लागतो का? परीक्षा असेल तर अभ्यासक्रम कोणता असतो? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना उमेदीच्या काळात सतावत असतात. यामुळे ते स्पर्धा परीक्षांची वाटदेखील पाहायला तयार नसतात. हीच गरज ओळखून महाविद्यालयात नुकताच जनरल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न कसे सोडविता येतील यांचे मार्गदर्शन करण्यात आले. त्यासाठी लागणाºया युक्त्या शिकविण्यात आल्या आणि विद्यार्थ्याकडून त्याचा सरावसुद्धा करण्यात आला.
जवळपास ४५० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रम आयोजनासाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलप्र्रमुख डॉ.जी.इ.चौधरी तसेच त्यांचे सहकारी, प्रा.एम.जी.भंडारी, प्रा.ए.बी.नेहेते व प्रा.वाय.व्ही.कोल्हे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी प्राचार्या डॉ.नंदिनी चौधरी, उपप्राचार्य डॉ.आर. डी. पाटील, डीन डॉ.पी.एम.महाजन तसेच सर्व विभागप्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Guidance for Competitive Examination in Faizpur Engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.