उंटावद येथे ‘माझी शेती, माझा सातबारा’अंतर्गत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:19 AM2021-08-14T04:19:38+5:302021-08-14T04:19:38+5:30

चांगदेव येथे वर्षावास प्रवचन मालिका चांगदेव, ता. मुक्ताईनगर : येथे भारतीय बौद्ध महासभा तथा दि ...

Guidance under ‘My Farming, My Satbara’ at Untawad | उंटावद येथे ‘माझी शेती, माझा सातबारा’अंतर्गत मार्गदर्शन

उंटावद येथे ‘माझी शेती, माझा सातबारा’अंतर्गत मार्गदर्शन

Next

चांगदेव येथे वर्षावास प्रवचन मालिका

चांगदेव, ता. मुक्ताईनगर : येथे भारतीय बौद्ध महासभा तथा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखेच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे पाचवे पुष्प नुकतेच गुंफण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांगदेवचे सरपंच निखिल बोदडे होते. प्रमुख पाहुणे नाशिक विभागीय सचिव के. वाय. सुरवाडे, तालुका अध्यक्ष शरद बोदडे, तालुका सरचिटणीस चंद्रमणी इंगळे, केंद्रीय शिक्षक प्रवचनकार पी.डी. सपकाळे होते. सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. तद‌्नंतर सपकाळे यांच्या प्रवचनाचे पाचवे पुष्प गुंफण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या धम्म ग्रंथावर प्रवचन करण्यात आले.

प्रास्ताविक जनार्दन बोदडे यांनी केले. युवराज बोदडे, मुरलीधर बोदडे, सुभाष बोदडे, गोकुळ बोदडे, फकिरा बोदडे, मधुकर इंगळे, रोहिदास इंगळे, मुकेश तायडे, ईश्वर शिरसोदे, महेंद्र बोदडे, राहुल बोदडे, विकी बोदडे, जगदेव बोदडे, रत्नपाल धुलधुले, विशाल तायडे, राजेश तायडे, सुभाबाई बोदडे, कमलबाई बोदडे, अंजना बोदडे, अनिता बोदडे, मीना बोदडे, ममता बोदडे, ललिता बोदडे, सुमनबाई बोदडे आदी हजर होते.

Web Title: Guidance under ‘My Farming, My Satbara’ at Untawad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.