जीएमसीत अग्निशमनचे प्रात्यक्षिकांमधून मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:18 AM2021-04-28T04:18:25+5:302021-04-28T04:18:25+5:30
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आग लागल्यानंतर करायच्या प्रतिबंधात्मक बाबींचे प्रात्यक्षिक मंगळवारी दुपारी घेण्यात आले. महापालिकेच्या ...
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आग लागल्यानंतर करायच्या प्रतिबंधात्मक बाबींचे प्रात्यक्षिक मंगळवारी दुपारी घेण्यात आले. महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. आग लागल्यानंतर विझविण्याचे उपकरण कसे वापरावे त्याची माहिती दिली. दरम्यान, प्रात्याक्षिक संपल्यानंतरही पंधरा ते वीस मिनिटे या ठिकाणी कचरा मात्र जळतच होता. काही वेळाने तो विझला.
अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. अरुण कसोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, डॉ. विलास मालकर, अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, सहायक अधिकारी सुनील मोरे उपस्थित होते.
यावेळी अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, फायरमन अश्वजित घरडे, नितीन बारी, तेजस जोशी यांनी उपस्थित यंत्रणेला आग प्रतिबंधनाची सविस्तर माहिती दिली. महिला डॉक्टरांकडून अधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिक करून घेतले.
या दिल्या टिप्स
विद्युत पॅनल बोर्डला आग लागली तर पाणी मारणे टाळा. झाडू मारल्याने आग विझू शकते. फायर बिग्रेडच्या वाहनाला येण्यासाठी रस्ता मोकळा हवा, त्यासाठी अद्ययावत असलेल्या पार्किंगचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. डॉ. इम्रान पठाण, डॉ. इम्रान तेली, डॉ. चेतन भंगाळे, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. अलोक यादव, अधिसेविका कविता नेतकर, स्वच्छता निरीक्षक बापू बागलाणे, कर्मचारी ज्ञानेश्वर डहाके, समाजसेवी अधीक्षक संदीप बागूल, मंगेश बोरसे, अरुण हळदे यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, विद्यार्थी परिचारिका, अधिकारी, कक्षसेवक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.