उद्या ऑनलाइन मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:12 AM2021-06-19T04:12:35+5:302021-06-19T04:12:35+5:30
ऑनलाइन सुविधेचा गैरवापर केल्यास कारवाई जळगाव : परिवहन विभागात सुरू करण्यात आलेल्या शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व पक्की ...
ऑनलाइन सुविधेचा गैरवापर केल्यास कारवाई
जळगाव : परिवहन विभागात सुरू करण्यात आलेल्या शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व पक्की अनुज्ञप्ती परवाना ऑनलाइन पद्धतीचा गैरवापर केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी ही प्रणाली सुरू करण्यात आली असली तरी राज्यात काही ठिकाणी शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी ही उमेदवाराऐवजी इतर अनधिकृत व्यक्ती देत असल्याच्या तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे.
अखेर डांबरीकरण झाले
जळगाव : महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात प्रभात चौकात होत असलेल्या उड्डाणपुलाच्या खाली डांबरीकरण करण्यात आले. पाऊस झाल्यानंतर या पुलाच्या खाली मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत होते. याविषयी ‘लोकमत’ने वृत्तही प्रकाशित केले होते. त्यानंतर अखेर या उड्डाणपुलाखाली डांबरीकरण करण्यात येऊन सपाटीकरण करण्यात आले.
नागरिक हैराण
जळगाव : तुरळक पाऊस झाला तरी वीज गुल होत असल्याने शहरातील विविध भागांतील नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिजाऊनगर, वाघनगर, श्रीधरनगर, श्यामनगर या भागांत वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. पावसात सातत्य नसल्याने उकाडा कायम असून, वीज गेल्यास नागरिक घामाघूम होतात.
चाऱ्या व्यवस्थित बुजविण्याची मागणी
जळगाव : शहरात ठिकठिकाणी चाऱ्या खोदण्यात आल्या होत्या. शिवकॉलनीमध्ये या चाऱ्या अद्यापही व्यवस्थित बुजविण्यात आलेल्या नाहीत. यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. या चाऱ्या व्यवस्थित बुजविण्याची मागणी परिसरातून होत आहे.