लेखन कौशल्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:19 AM2021-06-09T04:19:29+5:302021-06-09T04:19:29+5:30

जळगाव : एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाच्यावतीने सोमवारी प्रबंध लेखन कौशल्य विषयावर ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन ...

Guide students on writing skills | लेखन कौशल्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लेखन कौशल्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Next

जळगाव : एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाच्यावतीने सोमवारी प्रबंध लेखन कौशल्य विषयावर ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली.

यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन. माने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी एनटीव्हीएसच्या विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. डी. चौधरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, धुळे येथील प्राचार्य डॉ. बहिराम व्ही. वाय., प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात आयक्यूएसी समन्वयक डॉ. डी. आर. क्षीरसागर, डॉ. विजेता सिंग, डॉ. रेखा पाहुजा, प्रा. गणपत धुमाळे, डॉ. योगेश महाजन, डॉ. अंजली बोंदर, प्रा. अमिता वराडे, प्रा. ज्योती भोळे यांचाही सहभाग होता.

संशोधन तत्त्वाची मांडणी

कार्यशाळेत डॉ. एन. डी. चौधरी यांनी मानवी विकासातील संशोधनांचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. बहिराम यांनीही संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. रेड्डी यांनी संशोधन अहवाल लेखनाचे कौशल्य आणि प्रात्यक्षिक दृष्टिकोन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. क्षीरसागर यांनी संशोधनासाठी माहिती संकलनाचे शास्त्रीय पद्धती आणी साधने संदर्भात माहिती दिली.

Web Title: Guide students on writing skills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.