गुजरात भाजपचे पहिलेच मराठी प्रदेशाध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 06:50 PM2020-07-20T18:50:00+5:302020-07-20T19:16:39+5:30
जिल्ह्याचेसुपुत्र सी.आर.पाटील यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड
जळगाव - जिल्ह्याचे सुपुत्र व सुरत-नवसारी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सी.आर.पाटील यांची गुजरात भाजपच्या प्रदेशापदी निवड करण्यात आली आहे. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झालेले सी.आर.पाटील हे पहिलेच मराठी व्यक्ती ठरले आहेत.
सी.आर.पाटील हे मुळ वरणगावचे रहिवाशी असून, १९८५ च्या काळात ते सुरत येथे कामासाठी गेले होते. जीआयडीसीचे चेअरमन पासून भाजपच्या संघटनेतील अनेक महत्वाचे पदे त्यांनी सांभाळली आहेत. २००९ पासून ते भाजपच्या तिकीटावर सुरत-नवसारी लोकसभा मतदारसंघातून तीनवेळा निवडून आले आहेत. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांच्या वाराणसी मतदार संघाचा विकासाचा सर्व कार्यभार सी.आर.पाटील यांच्यावर सोपविण्यात आला होता. सी.आर.पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात. पाटील यांचे जळगाव शहराशी देखील घनिष्ठ संबंध असून, आदर्श नगरात त्यांचे निवासस्थान देखील आहे.