एरंडोल बस आगारातर्फे गुजरात बस सेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:13 AM2021-07-11T04:13:39+5:302021-07-11T04:13:39+5:30
एरंडोल : येथील बस आगारातर्फे सुरत, नवसारी, सेलवास या गुजरात बस सेवा सुरू करण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी सोय झाली ...
एरंडोल : येथील बस आगारातर्फे सुरत, नवसारी, सेलवास या गुजरात बस सेवा सुरू करण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. परवानगीअभावी या बस गाड्या रद्द होत्या. या तिन्ही लांब पल्ल्याच्या बस सेवा असल्यामुळे एरंडोल बस आगाराचे उत्पन्न वाढविण्यासाठी मोलाची भर पडणार आहे.
तालुक्यात जवळपास महिनाभरापासून कोरोना नियंत्रणात आला आहे. परंतु संक्रमण वाढ रोखण्यासाठी व तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अजूनही प्रवासी संख्येत अपेक्षित वाढ झालेली दिसून येते नाही. याशिवाय खरीप पेरण्यांच्या निमित्ताने शेतकरी व ग्रामीण जनता शेती कामात व्यस्त आहेत.
तसेच शाळा-महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी ये-जा करणे अशक्य आहे. या सर्व कारणास्तव लांब पल्ल्याच्या व मध्यम पल्ल्याच्या सेवा सुरू झाल्या असल्या तरी प्रवासी संख्या अत्यल्प आढळून येते. परिणामी रोज पाच ते सहा लाख रुपये येणाऱ्या उत्पन्नाऐवजी फक्त तीन ते साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.