काय सांगता! केळीच्या पिठापासून गुलाब जाम? आधी बिस्किटाच्या पेटंटचे मानकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 09:25 AM2024-03-27T09:25:31+5:302024-03-27T09:29:52+5:30
केळीच्या पिठाचे आयुष्य साधारणत : ६ महिन्यांचे, वाळलेल्या केळीच्या तुकड्यांचे एक वर्षांपेक्षा जास्त आयुष्य असते.
जळगाव : यावलमधील कुसुम आणि अशोक प्रभाकर गडे या दाम्पत्याने केळीच्या बिस्किटाला ‘पेटंट’ मिळविल्यानंतर आता केळीच्या पिठापासून ‘गुलाब जाम’ तयार केले. हे गुलाब जाम लोकांच्या पसंतीला उतरले आहेत.
केळीच्या पिठाचे आयुष्य साधारणत : ६ महिन्यांचे, वाळलेल्या केळीच्या तुकड्यांचे एक वर्षांपेक्षा जास्त आयुष्य असते. दर २-३ महिन्यांनी केळीचे तुकडे सूर्यप्रकाशात घातल्यास नक्कीच दीर्घकाळासाठी पौष्टिक ठरते. म्हणून तयार केलेल्या केळीच्या पिठात, दूध किंवा दुधाची पावडर घातल्यावर त्यांनी पीठ तयार केले. त्यांचे छोटेछोटे गोळे तयार करून ते तुपात तळले. त्यानंतर साखरेच्या पाकात बुडवून त्यांना रसाळ गोडवा वाहिला आहे.
केळीच्या पिठापासून तयार केलेले गुलाब जाम ‘मैदा’मुक्त आहेत. या गुलाब जामचा आस्वाद घेतल्यावर लहान मुलांच्या आतड्याला मैदा चिकटण्याची भीती नाही. तसा एकही घटक यामध्ये वापरण्यात आला नाही.
-अशोक प्रभाकर गडे, यावल