मंत्रीपदासाठी गुलाबरावांनी संजय राऊतांचेच दार ठोठावले, संपर्क प्रमुख संजय सावंत यांचा दावा

By विलास.बारी | Published: June 25, 2023 07:56 PM2023-06-25T19:56:52+5:302023-06-25T19:56:59+5:30

शिरसोलीत शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा

Gulabrao knocked on Sanjay Raut's door for the ministerial position, claims Sanjay Sawant | मंत्रीपदासाठी गुलाबरावांनी संजय राऊतांचेच दार ठोठावले, संपर्क प्रमुख संजय सावंत यांचा दावा

मंत्रीपदासाठी गुलाबरावांनी संजय राऊतांचेच दार ठोठावले, संपर्क प्रमुख संजय सावंत यांचा दावा

googlenewsNext

जळगाव : मंत्रीपद मिळावे म्हणून गुलाबराव पाटील यांनी कितीतरी वेळा संजय राऊत यांचे दार ठोठावले, तेव्हा कुठे त्यांना मंत्रीपद मिळाले. आज तेच गुलाबराव संजय राऊत यांच्यावर टिका करीत आहेत. सप्तशृंगी देवीचे गुलाबराव उपासक आहेत, या देवीच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं की राऊतांमुळे मंत्रीपद मिळाले नाही, असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दिले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचा जिल्हा परिषद गट मेळावा तालुक्यातील शिरसोली येथे रविवारी झाला. त्यावेळी सावंत यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना हा दावा केला. मंत्री गुलाबराव पाटील हे वणीच्या सप्तशृंगी देवीचे उपासक आहेत दर वाढदिवसाला ते नेहमीच त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात त्यांनी देवीच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं कि मी संजय राऊत यांच्यामुळे मंत्री झालेलो नाही.

गुलाबरावांनी आपली पात्रता तपासावी आणि मग संजय राऊत यांच्यावर आरोप करावे आपण ज्यांच्या जीवावर मोठे झालो आहोत त्यांच्यावर आपण आरोप करु शकतो का? हे तपासावे. आणि मग निष्ठेच्या गोष्टी कराव्यात असेही ते म्हणाले. मी गुलाबराव यांच्यासोबत काम केले आहे. त्यांचे अनेक किस्से आणि अनेक गोष्टी मला माहित आहेत, असाही गौप्यस्फोट त्यांनी केला.

यावेळी व्यासपीठावर शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख सचिन आसबे, युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, विभागीय सचिव विराज कावडीया, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश पाटील, धरणगाव तालुकाप्रमुख जयदीप पाटील,महिला तालुकाप्रमुख रुपाली शिवदे उपस्थित होते. मेळाव्याचे आयोजन उमेश पाटील यांनी केले होते.

Web Title: Gulabrao knocked on Sanjay Raut's door for the ministerial position, claims Sanjay Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.