'विधानसभे' पूर्वीच जळगावात गुलाबराव पाटील विरुद्ध देवकरांचा सामना रंगणार...?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 02:52 PM2022-11-14T14:52:28+5:302022-11-14T14:54:10+5:30

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर, आता अंतिम पॅनल तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Gulabrao Patil vs Deokar will be played in Jalgaon before Vidhan Sabha election | 'विधानसभे' पूर्वीच जळगावात गुलाबराव पाटील विरुद्ध देवकरांचा सामना रंगणार...?

'विधानसभे' पूर्वीच जळगावात गुलाबराव पाटील विरुद्ध देवकरांचा सामना रंगणार...?

Next

जळगाव:  जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर, आता अंतिम पॅनल तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप- शिवसेना शिंदे गट यांच्यात आमने- सामने लढत होणार आहे. यामध्ये सर्वांत मोठी लढत पालकमंत्री गुलाबराव पाटील विरुद्ध छाया गुलाबराव देवकर यांच्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच दूध संघात या लढतीकडे लक्ष राहणार आहे.

जिल्हा दूध संघाची निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच राजकारण तापले आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वपक्षीयच्या चर्चेवरून आता थेट आमने- सामने लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत खडसेंना सोबत न घेण्याचाच निर्णय घेण्यात आला. तसेच भाजप- शिंदे गटाच्या संभाव्य पॅनलमधील उमेदवारांबाबतदेखील चाचपणी झाली होती. या बैठकीनंतर महाविकास आघाडीकडूनदेखील स्वतंत्र पॅनलबाबत चर्चा सुरू झाली असून, आपल्या संभाव्य उमेदवारांची यादी देखील मविआकडून तयार झाली आहे. या संभावित उमेदवारांची यादी 'लोकमत'च्या हाती लागली आहे.

दिग्गज भिडणार आमने- सामने

१. जळगाव तालुका मतदारसंघातून छाया गुलाबराव देवकर यांच्यासह महापौर जयश्री महाजन यांच्या सासू मालती महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

२. दोन्ही उमेदवारांपैकी एका उमेदवाराचा अर्ज या मतदारसंघात कायम राहून दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज महिला राखीवमधून कायम राहू शकतो. जर मालती महाजनांचा महिला राखीवमधील अर्ज कायम राहिल्यास, जळगाव तालुक्यात छाया गुलाबराव देवकर यांचा अर्ज कायम राहील. 

३. याच मतदारसंघातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील आपला अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रतिस्पर्धी आमनेसामने येण्याची शक्यता आहे किंवा मालती महाजन विरुद्ध गुलाबराव पाटील यांच्यातही लढत होण्याची शक्यता आहे. 

४. यासह दिलीप वाघ विरुद्ध किशोर पाटील, सतीश पाटील विरुद्ध चिमणराव पाटील, मंदाकिनी खडसे विरुद्ध मंगेश चव्हाण यांच्यातही लढत होण्याची शक्यता आहे. 

मविआचे हे असू शकतात उमेदवार

मुक्ताईनगर - मंदाकिनी खडसे
चाळीसगाव - प्रमोद पाटील
अमळनेर - आमदार अनिल पाटील
भडगाव - डॉ. संजीव पाटील 
पाचोरा - माजी आमदार दिलीप वाघ
पारोळा - माजी आमदार डॉ. सतीश पाटील
जळगाव - छाया गुलाबराव देवकर किंवा मालती महाजन
जामनेर - दिनेश पाटील किंवा नाना राजमल पाटील
बोदवड - अॅड. रवींद्र पाटील
यावल - हेमराज चौधरी
रावेर - जगदीश बढे
भुसावळ - शामल झांबरे
चोपडा - इंदिराताई पाटील किंवा रवींद्र पाटील
एरंडोल - अमर जैन किंवा नाना महाजन
धरणगाव - वाल्मिक पाटील किंवा ओंकार मुंदडा
एसटी - श्रावण ब्रम्हे

Web Title: Gulabrao Patil vs Deokar will be played in Jalgaon before Vidhan Sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.