विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार- गुलाबराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2017 03:30 PM2017-06-05T15:30:38+5:302017-06-05T15:30:38+5:30
1 कोटी 87 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भुमिपूजन
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दिनांक 5:- धरणगाव शहरातील पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असणारा निधी तत्काळ उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी दिली.
धरणगाव नगरपालिकेतर्फे करण्यात येणा:या 1 कोटी 87 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भुमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार रवींद्र मिर्लेकर, नगराध्यक्ष सलीम पटेल, उपनगराध्यक्ष सुरेखा महाजन, जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, पंचायत समितीचे सभापती सचिन पवार, उपसभापती प्रेमराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, मुख्याधिकारी सपना वसावा, गुलाबराव वाघ उपस्थित होते.
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, धरणगाव शहरातील नागरिकांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 7 कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली असून लवकरच 5 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मंजूर कामांपैकी आज दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सोनवद रस्ता स्मशानभूमी मध्ये हॉल बांधणे 28 लाख रुपये, पेव्हर ब्लॉक बसविणे 68 लाख रुपये, वैशिष्टपूर्ण योजनेतंर्गत शहरात 9 लक्ष लिटर पाण्याची टाकी बांधणे 63 लाख रुपये, शहरातील महात्मा गांधी उद्यान ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापयर्ंत पाईप लाईन टाकणे 28 लाख रुपये अशी एकूण 1 कोटी 87 लाख रुपयांच्या कामांच्या कामांचे भुमिपुजन करण्यात आले आहे. नवीन पाण्याच्या टाकीमुळे शहरातील पाणी साठविण्याची क्षमता वाढणार असून त्यामुळे शहराला पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तसेच शहरातील कॉलनी रस्त्यांचे डांबरीकरणाचा प्रस्ताव असून हे कामही लवकरच सुरु करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्यावतीने सत्कार करण्यात आला. धरणगाव नगरपालिका संपूर्ण हागणदारीमुक्त झाल्याचे केंद्रीय समितीने जाहिर केल्याबद्दल मुख्याधिकारी सपना वसावा यांचा सत्कार करण्यात आला.