Lok Sabha Election 2019 : तोफा थंडावल्या, उद्या मतदान; दुरंगी लढत होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:57 AM2019-04-22T11:57:44+5:302019-04-22T11:58:52+5:30

अखेरच्या दिवशी उमेदवारांची तारांबळ

Guns shutdown; polling tomorrow; Chance of being in the long run | Lok Sabha Election 2019 : तोफा थंडावल्या, उद्या मतदान; दुरंगी लढत होण्याची शक्यता

Lok Sabha Election 2019 : तोफा थंडावल्या, उद्या मतदान; दुरंगी लढत होण्याची शक्यता

Next

जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होत असून भाजप-शिवसेना युती व काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी यांच्यात लढत होत आहे. मंगळववारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार उन्मेष पाटील हे प्रथमच लोकसभा निवडणूक रिंगणात असून त्यांची लढत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्यासोबत होत आहे. सोबतच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार अंजली बाविस्कर यांच्यासह एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
संपूर्ण प्रचारादरम्यान ‘मोदी’ सरकार केंद्रबिंदू राहिले. युतीने मोदी सरकारच्या यशोगाथा तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, वंचित बहुजन आघाडीने मोदी सरकारच्या अपयशाचे पाढे मतदारांसमोर वाचले. यावेळी प्रचारात आक्रमकपणा दिसून आला नाही तर मतदारांच्या गाठीभेठी व कॉर्नर मिटिंगवर सर्वच उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात भर दिला.
निवडणुकीचा प्रचार रविवारी संध्याकाळी संपला. अखेरचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांची मतदारांच्या गाठीभेठीसाठी तारांबळ उडाली होती.
आता मतदानापर्यंत मुका प्रचार सुरू राहणार असून १९ लाख २५ हजार ३५२ मतदारांचा कौल मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मतदान वेळ सकाळी ७ ते सायं. ६ पर्यंत
मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. मतदान केंद्रात ६ वाजेपर्यंत रांगेत असणाºया प्रत्येक मतदारांना मतदान केंद्रातील अधिकारी एक कूपन देईल. ज्यांच्याजवळ कूपन असेल त्यांचे मतदान होईपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहील.
पोलिंग पार्टी आज रवाना होणार
मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या पोलिंग पार्टीला (मतदान केंद्रातील अधिकारी व कर्मचारी) सोमवारी ईव्हीएम बॅलेटसह सर्व साहित्याचे वितरण केले जाईल. विधानसभानिहाय करण्यात आलेल्या स्ट्राँग रुम परिसरात साहित्याचे वितरण करण्यात येईल. सर्व पोलिंग पार्टी दुपारपर्यंत आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचतील. मतदानाची व्यवस्था करतील आणि तसा अहवाल सादर करतील.
सकाळी ६ वाजता ‘मॉक पोल’
मतदान केंद्रावर सकाळी ६ वाजता मॉक पोल घेण्यात येईल. यात सर्व उमेदवार व नोटांसह ५० मत टाकण्यात येतील. हे मॉक पोलिंग एजंटच्या उपस्थितीत होईल. यासाठी पोलिंग एजंटला कुठल्याही परिस्थितीत सकाळी ६.१५ वाजेपर्यंत मतदान केंद्रात पोहोचावे लागेल. ते न आल्यास मॉक पोल सुरू केले जाईल. ते ७ वाजेपर्यंत चालेल. ७ वाजेपासून मतदानास सुरुवात होईल.

Web Title: Guns shutdown; polling tomorrow; Chance of being in the long run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.