सार्वजनिक विद्यालयात गुणवंत पाटील यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:50 AM2021-02-05T05:50:45+5:302021-02-05T05:50:45+5:30
जळगाव : सार्वजनिक विद्यालय आसोदा येथे हैदराबाद आय. आय. टी सहाय्यक प्रशासनिक अधिकारी म्हणून निवड झालेले गुणवंत ...
जळगाव : सार्वजनिक विद्यालय आसोदा येथे हैदराबाद आय. आय. टी सहाय्यक प्रशासनिक अधिकारी म्हणून निवड झालेले गुणवंत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही. एस. खाचणे होत्या. प्रास्ताविक पर्यवेक्षक डॉ. मिलिंद बागूल यांनी केले .प्रसंगी गुणवंत पाटील, कल्याणी पाटील, भाग्यश्री चौधरी, जयश्री बाविस्कर, गौरव माळी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शुभांगीनी महाजन यांनी तर आभार डी. जी. महाजन यांनी मानले.
बी.एल.ओंवरील कार्यवाही मागे घेण्याची मागणी
जळगाव - बूथ लेव्हल ऑफिसर(बीएलओ) म्हणून शिक्षक काम करतात. त्यात काहींच्या हातून चुका झाल्या म्हणून तत्कालिन तहसीलदार अमोल निकम यांनी २०१७ मध्ये शहरातील बहुसंख्य बीएलओंवर फौजदारी कार्यवाही केली. त्यांची पोलीस चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. ही कार्यवाही मागे घेण्याची मागणी शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांनी केली आहे.
शासकीय योजना शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिवसेना जळगाव महानगर व युवाशक्ती फाउंडेशन तर्फे शहरातील पांडे चौक येथे २१ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान विविध शासकीय योजना शिबिर आयोजित करण्यात आले. यात विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा, यासाठी सहकार्य केले जात आहे.
उद्घाटन नुकतेच शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महानगरप्रमुख शरद तायडे, युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक विराज कावडीया, सचिव अमित जगताप, शोभा चौधरी, प्रताप पाटील, युवासेना जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, दिनेश जगताप, मानसिंग सोनवणे, गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर, उमेश चौधरी, जाकीर पठाण, हेमंत महाजन, वसिम खान, प्रीतम शिंदे, संदीप सूर्यवंशी, गोकुळ बारी, सौरभ कुळकर्णी, गजानन चौधरी, सुनील मराठे, पियुष हसवाल, उमाकांत जाधव उपस्थित होते.