जवखेडावासियांचे गुरुमाऊली विसावले....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 06:43 PM2021-04-15T18:43:14+5:302021-04-15T18:43:34+5:30

श्री दत्त गादीपीठाचे आचार्य श्री संतोषपुरी गुरू बाळपुरी महाराज यांचे बुधवारी दुपारी ३ वाजता नाशिक येथील दवाखान्यात निधन झाले.

Gurumauli of Javkheda people rested .... | जवखेडावासियांचे गुरुमाऊली विसावले....

जवखेडावासियांचे गुरुमाऊली विसावले....

googlenewsNext
ठळक मुद्देवयाच्या ९२व्या वर्षी पंचत्वात विलीन...

लोकमत न्यूज नेटवर्क

जवखेडा, ता. अमळनेर : जवखेडा येथील श्री दत्त गादीपीठाचे आचार्य श्री संतोषपुरी गुरू बाळपुरी महाराज यांचे बुधवारी दुपारी ३ वाजता नाशिक येथील दवाखान्यात वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले.

जवखेडा आणि आनोरे दरम्यान शेतशिवारातील टेकडीवर असलेले दत्त मंदिर... याच जागेवर स्व. आचार्य तुळशीपुरी महाराजांनी १९१३ला झोपडीवजा कुटीयारुपी मंदिराची स्थापना केली. त्यांच्याआधी स्व. आचार्य सैलापुरी महाराजांनी याच जागेवर पादुका पूजन करुन कुटीया उभारली होती, अशी आख्यायिका आहे. जंगलातील याच टेकडीवरून तुळशीपुरी महाराजांनी जवखेडावासियांना अध्यात्माचे धडे दिले. पुढे स्व. बाळपुरी महाराजांनी १९६१मध्ये गावकऱ्यांच्या सहकार्याने गावातच मंदिराची स्थापना करुन आचार्य संतोषपुरी महाराजांनी १९६९ला दीक्षा घेतली अन् तेथूनच गावात दररोज सकाळी प्रभातफेरी व अभंगांचे सूर घुमू लागले.

दरपौर्णिमेला रात्री पुजापाठही होऊ लागला. दत्त जयंतीला मोठा उत्सव होऊ लागला. अख्खे गाव दत्तमार्गीमय झाले. परिणामी दारु, मांसाहार गावातून हद्दपार झाले. पुढे आचार्य संतोषपुरी महाराजांच्या मार्गदर्शनाने व गावकऱ्यांच्या सहकार्याने १९९५ला बसस्थानक परिसरातच भव्यदिव्य श्री गुरुदेव दत्त गादीपीठ मंदिर उभारण्यात आले. नित्यनेमाने अध्यात्मिक शिकवण देता देता पूर्ण गाव त्यांनी दत्तमार्गी केले. ‘‘ना दारू, ना मांस जवखेडाकरांचा असाही ध्यास’’ ही संकल्पना अंमलात आणली. मांस विक्री, मद्य प्राशन या गोष्टी त्यांनी गावातून त्यांच्या अध्यात्मिकतेच्या शिकवणीतून हद्दपार केल्या. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये अध्यात्मिकतेची गोडी रुजवली. पूर्वी असलेल्या टेकडीवरील मंदिराच्या जागेवर जीर्णोद्धार करून मंदिर उभारण्याचा संकल्प संतोषपुरी महाराजांनी जवखेडावासियांजवळ मांडला अन् तो गावकऱ्यांच्या सहकार्याने व तालुक्यातील, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व दानशूर भाविकांच्या देणगीरूपी मदतीतून २००३ला या जागेवर जीर्णोद्धार करून टुमदार मंदिर उभारले अन् तेथेही पुन्हा पुजाविधी होऊ लागले. दर पौर्णिमेला पूजा होऊ लागली.

गेल्या ७ वर्षांपूर्वी बालबह्मचारी सनंदनपुरी महाराजांनी गावातील मंदिरावर दीक्षा घेतलीय... तेच सध्या महाराजांची काळजी घेत आजच्या तरुणाईला अध्यात्मिकतेचे धडे देत आहेत.

Web Title: Gurumauli of Javkheda people rested ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.