जळगावमध्ये गुटख्याची पुडी दिली नाही: लहान मुलांमध्ये भांडण, एकाने केला गोळीबार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 16:43 IST2023-07-17T16:41:55+5:302023-07-17T16:43:26+5:30
जळगाव शहर पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या एका संशयित आरोपीला अटक केली आहे.

जळगावमध्ये गुटख्याची पुडी दिली नाही: लहान मुलांमध्ये भांडण, एकाने केला गोळीबार!
प्रशांत भदाणे
लहान मुलांच्या भांडणातून मोठ्यामंध्ये हाणामारी होऊन गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना आज दुपारी जळगाव शहरातील शिवाजीनगर भागात घडलीय. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी जळगाव शहर पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या एका संशयित आरोपीला अटक केली आहे. तर मारहाण करणाऱ्या दोन्ही अल्पवयीन आरोपींना देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. दीपक बागुल असं गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपीचं नाव आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, यापूर्वी त्याच्यावर खुनासह मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये.
गुटख्याची पुडी मागितल्याचा कारणावरून दोन अल्पवयीन मुलांमध्ये भांडण झालं. याच भांडणाचं पर्यवसान पुढं मोठ्यांच्या भानगडीत झालं आणि त्यात दीपक याने गोळीबार केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आलंय. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती पोलीस उप अधीक्षक संदीप गावित यांनी लोकमतला दिली