डीआरडीएच्या परीक्षेत निम्म्या उमेदवारांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:17 PM2020-01-13T22:17:55+5:302020-01-13T22:18:10+5:30
जळगाव : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या विविध पदांसाठी रविवारी शहरातील चार केंद्रावर परीक्षा घेण्यात आली़ मात्र, या परीक्षेला आलेल्या ...
जळगाव : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या विविध पदांसाठी रविवारी शहरातील चार केंद्रावर परीक्षा घेण्यात आली़ मात्र, या परीक्षेला आलेल्या अर्जांपैकी तब्बल ५३ टक्के उमेदवार गैरहजर होते़ विभागाने आम्हाला परीक्षेसंदर्भात कळविलेच नसल्याचा आरोप काही उमेदवारांनी केला आहे़ दरम्यान, या परीक्षेचा सायंकाळीच निकाल जाहीर करण्यात आला़
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डिआरडीए) च्या प्रभाग समन्वयक, डाटा एंट्री आॅपरेटर, लेखापाल, ्रप्रशासन सहाय्यक, प्रशासन व लेखा सहाय्यक, शिपाई आदी ५९ पदांसाठी शहरातील आऱ आऱ विद्यालय, विद्यानिकेतन, ला़ ना़ शााळा, या चार केंद्रावंर दुपारी ११ ते एक वाजेच्या दरम्यान परीक्षा घेण्यात आली़
या पदांसाठी १३१६ अर्ज दाखल झाले होेते़ त्यापैकी ७०९ उमेदवारांनी दांडी मारली तर ६०७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली़
जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीआरडीएचे प्रभारी प्रकल्प संचालक डॉ़ पी़ सी़ शिरसाठ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, विस्तार अधिकारी किशोर राणे आदींनी काम पाहिले़ रविवारी परीक्षा होती याची निम्म््या उमेदवारांना कुठलीही माहिती नव्हती, आम्हाला कसलीही कल्पना दिली गेली नसल्याचे काही उमेदवारांचे म्हणणे आहे़
सायंकाळीच निकाल
या परीक्षेचा सायंकाळीच निकाल जाहीर करण्यात आला. डिआरडीए कार्यालयाच्या तळमजल्यावर याद्या लावण्यात आल्या आहे़त़ अधिकाऱ्यांनी रात्री आठ वाजेच्या सुमारास या याद्या लावल्याची माहिती मिळाली.