जिल्हा रुग्णालयातील निम्मे डॉक्टर सुट्टीवर
By Admin | Published: May 28, 2017 10:26 AM2017-05-28T10:26:36+5:302017-05-28T10:26:36+5:30
रुग्णसेवेवर परिणाम : रुग्णांचे प्रचंड हाल
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.28 : जिल्हा रुग्णालयात कार्यरत 14 वैद्यकीय अधिका:यांपैकी सात वैद्यकीय अधिकारी एकाच वेळी सुट्टीवर गेल्याने त्याचा रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे.
जिल्हा रुग्णालयात अगोदरच वैद्यकीय अधिका:यांची संख्या कमी आहे. मंजूर 39 वैद्यकीय अधिका:यांपैकी केवळ 14 वैद्यकीय अधिका:यांवर जिल्हा रुग्णालयाचा कारभार सुरू आहे. अपघातासह इतर आजाराच्या येणा:या रुग्णांची संख्येदेखील मोठी असते. त्यात आता उन्हाळ्य़ाच्या सुटय़ांमुळे 14 पैकी सात वैद्यकीय अधिकारी एकाच वेळी सुट्टीवर गेले.
जिल्हा रुग्णालयातील गैरसोयी व रिक्त जागांची नेहमीच ओरड असते. मंजूर पदांपैकी केवळ एक तृतीयांश डॉक्टरच कार्यरत असल्याने नेहमी जिल्हा रुग्णालयात कामाचा ताण असतो. याचाच परिणाम म्हणून अनेक वैद्यकीय अधिकारी येथे काम न करणेच पसंत करतो व सोडून जात असतो. त्यात रिक्त जागा भरल्या जात नाही. त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होतो. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील रिक्त जागा तत्काळ भरल्या जाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.