वादळी वाऱ्यांमुळे निम्मे जळगाव शहर अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:15 AM2021-05-17T04:15:03+5:302021-05-17T04:15:03+5:30
महावितरण : अनेक ठिकाणी विद्युत तारांवर झाडे कोसळली वादळी वाऱ्यांमुळे निम्मे शहर अंधारात महावितरण : अनेक ठिकाणी विद्युत तारांवर ...
महावितरण : अनेक ठिकाणी विद्युत तारांवर झाडे कोसळली
वादळी वाऱ्यांमुळे निम्मे शहर अंधारात
महावितरण : अनेक ठिकाणी विद्युत तारांवर झाडे कोसळली
मुख्य पान एक साठी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रविवारी दुपारपासून झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागातील विद्युत तारांवर फांद्या कोसळल्या मुळे वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला तर काही ठिकाणी तीन ते चार तासांनी वीज पुरवठा सुरळीत सुरू झाला. ऐन मे हिट मध्ये तीन ते चार तास वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरीकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.
दुपारी चार पासून सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शहरातील शिरसोली रोड येथे वीज खांब कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे या भागातील संपुर्ण वीज पुरवठा खंडित झाला होता. तसेच सायंकाळी पाच च्या सुमारास वादळी वाऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शहरातील मेहरुण, महाबळ, अयोध्या नगर, मायादेवी नगर, गणेश कॉलनी, पिंप्राळा या परिसरात अनेक ठिकाणी वीज तारांवर झाडांच्या फांद्या कोसळल्या. त्यामुळे या भागातील अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला. त्यात पाऊस सुरू झाल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कामात अडथळा निर्माण होत असल्याने काही वेळ काम बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा सायंकाळी तांत्रिक बिघाड शोधायला सुरुवात करून, रात्री नऊ पर्यंत शहरातील विविध भागांतील वीज पुरवठा सुरळीत सुरू झाल्याचे महावितरण प्रशासनातर्फे सांगण्यात आले.