चोपड्यात नालाखोलीकरणानंतर दीड कोटी लिटर पाण्याचा संचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:55 PM2018-06-07T13:55:10+5:302018-06-07T13:55:10+5:30

पीपल्स को-बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट व भारतीय जैन संघटनेच्या मदतीने सुंदरगढी व चुंचाळे रस्त्यालगत असलेल्या नाल्याचे खोलीकरण करण्यात आले. पहिल्याच पावसात १.५ कोटी लिटर पाण्याचा संचय झाल्याने बंधारा फूल्ल भरला.

Half a million liters of water accumulation after stalking in Chopda | चोपड्यात नालाखोलीकरणानंतर दीड कोटी लिटर पाण्याचा संचय

चोपड्यात नालाखोलीकरणानंतर दीड कोटी लिटर पाण्याचा संचय

Next
ठळक मुद्देचोपडा पीपल्स को- बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट व भारतीय जैन संघटनेच्या लोकसहभागपहिल्या पावसात बंधारा झाला फुल्लखोलीकरणासाठी चालले सलग २२ तास मशिन

चोपडा, जि.जळगाव : पीपल्स को-बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट व भारतीय जैन संघटनेच्या मदतीने सुंदरगढी व चुंचाळे रस्त्यालगत असलेल्या नाल्याचे खोलीकरण करण्यात आले. पहिल्याच पावसात १.५ कोटी लिटर पाण्याचा संचय झाल्याने बंधारा फूल्ल भरला. बुधवार ६ रोजी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, नगरसेवक हितेंद्र देशमुख, चेअरमन चंद्रहास गुजराथी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
सुंदरगढी भागातील बोरेवेल मधील पाणी साठा कमी होत गेल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागला. पाणी टंचाई भीषणता व मागील वर्षा पासून सुंदरगढी प्रभागातील समविचारी समूह प्रयत्नशील होते. गेल्या वर्षापासूनच महाराष्ट्रभरातील यशस्वी जल संवर्धन प्रकल्पांना भेटी सुरु करीत नगरसेवक हितेंद्र देशमुख यांनी प्रकल्प राबवायचा निर्धार केला.
सुंदरगढी भागात भीमराव देशमुख, भगवान देशमुख, राजेंद्र देशमुख, दिलीप देशमुख, विजय यादनिक तसेच चोपडा शहरातील सर्व खाजगी क्लासचे संचालक व शिक्षकवृंद यांच्या मदतीने दीड लाखाचा प्राथमिक निधी जमा केला. त्यानंतर ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी व पीपल्स बँक चेअरमन चंद्रहास भाई यांचे कडे सदर कामात चोपडा पीपल्स को - बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट कडून मदत करण्याचे आवाहन केले आणि त्यांनीही होकार दिला.
नाला खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी अभियंता विलास एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. जैन संघटनेचे प्रमुख शांतीलाल मुथा यांनी पोक्लंड मशीन उपलब्ध करून दिले. सदर कामात रवींद्र अलिझाड (सनी) यांनी मोठे सहकार्य केले. पावसाळा तोंडावर असतांना मशीनचा एक मिनिट सुद्धा वाया जावू नये म्हणून २२ तास मशीन चालविले गेले. ११ मीटर रुंद, २० फूट खोल व २५० मीटर लांबीचा नाला खोलीकरणाचे काम फक्त ६ दिवसात पूर्ण करण्यात आले. यासाठी मशीन आॅपरेटर रमणभाई, सिकंदर यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Half a million liters of water accumulation after stalking in Chopda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.