हमाल माथाडीचे कामबंद आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 07:57 PM2018-12-12T19:57:40+5:302018-12-12T19:59:25+5:30

शासन निर्णयाचा विरोध करण्यासाठी हमाल-माथाडींनी बुधवारपासून कामबंद आंदोलनास सुरुवात केली.

Hamal Mathadi's Kambandh movement continues | हमाल माथाडीचे कामबंद आंदोलन सुरू

हमाल माथाडीचे कामबंद आंदोलन सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देमाथाडी कायद्याची अंमलबजावणी करावीहमालांच्या पाठीवरील लिलाव कंत्राट पद्धत बंद करावी

बोदवड, जि.जळगाव : शासन निर्णयाचा विरोध करण्यासाठी हमाल-माथाडींनी बुधवारपासून कामबंद आंदोलनास सुरुवात केली.
पणन संचालकांनी १६ डिसेंबर २०१४ रोजी इलेक्ट्रीक व भोईतोल काट्याच्या तोलाई कपातीस स्थगिती दिली होती. त्याच्याविरोधात राज्य हमाल माथाडी संघाने विरोध करीत बेकायदेशीर परिपत्रक स्थगित करण्यास भाग पाडले होते. परंतु पुन्हा १ डिसेंबर २०१८ पासून सदर परिपत्रकावरील स्थगिती हटविण्याचे आदेश काढण्यात आले असून, या परिपत्रकविरोधात राज्य हमाल माथाडी १२ रोजीपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
मागण्याचे निवेदन उपनिबंधकांंना देण्यात आले. त्यात हमाल-माथाडींना बाजार समितीचे नोकर म्हणून घोषित करावे व बाजार समितीत सवमावून घ्यावे, राज्यातील शासकीय गोदामामधील हमालांचे पाठीवरील लिलाव कंत्राट पद्धत बंद करावी, जिल्ह्यात माथाडी कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी या मागण्याचे निवेदन बुधवारी हमाल-माथाडी बांधवांनी दिले. निवेदनावावर शांताराम चौधरी, सुभाष जवरे, रमेश गावंडे, भिकू रेंगे, गोपाल बडगुजर, कैलास वाणी, अजय शेळके, अजय पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Hamal Mathadi's Kambandh movement continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.