हगणदरीमुक्तीत मनपा पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2017 12:59 AM2017-02-11T00:59:53+5:302017-02-11T00:59:53+5:30

नगरविकास विभागाची नाराजी : मुंबईत घेतला जाणार आढावा

Hambantari Mukta Manpa trailing | हगणदरीमुक्तीत मनपा पिछाडीवर

हगणदरीमुक्तीत मनपा पिछाडीवर

Next

जळगाव : हगणदरीमुक्तीत मनपाकडून अद्याप समाधानकारक कामगिरी नसल्याने मनपाच्या कामकाजावर नगर विकास विभागाने नाराजी व्यक्त केली असून कामांना गती देण्याच्या सूचना केल्या आहेत. या संदर्भात १ मार्च रोजी मुंबईत आढावा बैठकही घेतली जाणार आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छ भारत अभियान तसेच हगणदरी मुक्तीसाठी विविध पातळ्यांवर काम केले जात आहे. मात्र त्यात अद्यापही फारशी प्रगती नाही. या संदर्भातील अहवाल पाहिल्यानंतर नगर विकास विभागानेही नाराजी व्यक्त केली आहे. या विभागाचे अवर सचिव मिलिंद कुलकर्णी यांचे पत्र मनपास प्राप्त झाले आहे. हगणदरी मुक्तीची प्रगती असमाधानकारक असल्याचे या पत्रात म्हटले आहे. हे उद्दीष्ट ३१ मार्च २०१७ पूर्वी पूर्ण करून शहर हगणदरी मुक्त करावे असे आदेशही या पत्रात देण्यात आले असून १ मार्च रोजी मुंबईत आढावा बैठक घेतली जाणार असल्याचेही कळविण्यात आले आहे. या बैठकीत हगणदरीमुक्तीचा अहवाल सादर करावा लागणार  आहे.
वैयक्तिक शौचालयांवर भर
हगणदरी मुक्तीचा एक भाग म्हणून शहरात गरीब वस्त्यांमध्ये वैयक्तीक शौचालय उभारणी केली जात आहे. यासाठी मनपाकडे ५६३६ अर्ज प्राप्त झाले होते. शौचालय बांधण्यासाठी लाभधारकास १२ हजाराचे अनुदान देण्यात येणार आहे. शासनाकडून त्यासाठी ५ कोटी ६२ लाखाचे अनुदानही प्राप्त झाले आहे. यात काहींना अनुदानाचा पहिला तर अनेकांना दुसरा हप्ताही वितरीत झाला आहे. १७८७ नागरिकांनी अनुदान घेऊन अद्यापही शौचालयाचे बांधकाम केलेले नाही. तर ११३० जणांचे बांधकाम सुरू झाले आहे. अनुदानातून शहरात आतापर्यंत २७१९ जणांची शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत. अर्ज आलेल्या ५६३६ नागरिकांना मनपाने शौचालय उभारणीसाठीचा पहिला सहा हजाराचा हप्ता म्हणजे ३ कोटी ३८ लाख १६ हजाराचे अनुदान वितरीत केले आहे.

Web Title: Hambantari Mukta Manpa trailing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.