जळगावात मोठय़ा अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 11:45 AM2017-09-13T11:45:53+5:302017-09-13T11:45:53+5:30

विशेष मोहीम : 176 किलो कॅरीबॅग जप्त; दहा हजाराचा दंडही वसूल

Hammer on massive encroachments in Jalgaon | जळगावात मोठय़ा अतिक्रमणांवर हातोडा

जळगावात मोठय़ा अतिक्रमणांवर हातोडा

Next
ठळक मुद्देभंगारच्या दुकानांवर कारवाईजागेवरच प्रत्येकी पाच हजाराचा दंडफुले मार्केटमधील  गाळेधारकांना दिली समज

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 13 - महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विशेष मोहीमेत मंगळवारी काटय़ाफाईल व इस्लामपुरातील पक्की अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. याच कारवाई दरम्यान पोलनपेठ भागात प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणा:या दोन दुकानदारांकडून 176 किलो कॅरीबॅग जप्त करण्यात येऊन त्यांच्याकडून दहा हजाराचा दंड वसूल करण्यात आला. 
सलग दुस:या दिवशी सकाळी 9 वाजेपासून माहीमेस सुरूवात झाली. मनपातील अधिकारी व कर्मचारी मिळून 300 जणांचा ताफा या मोहीमेत सहभागी झाला होता. 
जप्तीची कारवाई सुरूच
 फुले मार्केट, गांधी मार्केटमध्ये व परिसरातील विक्रेत्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. फुले मार्केटमधील कारवाईत 57 झाडू, 20 भांडे स्टॅँड, कॅरेट 3 , स्टिलचे 3 रॅक, स्टिलचे डबे 3, सुभाष चौकातून   एका गल्लीतून 2 पेटय़ा जप्त करण्यात आल्या, पाईप 11 नग, दुकानांमध्ये चढण्यासाठी रस्त्यावर पाय:या ठेवल्या होत्या त्या 3, भांडे ठेवण्याचे 3 स्टॅँड असे साहित्य जप्त करण्यात आले. 
इस्लामपुरातील रस्ता मोकळा
इस्लामपूरा भागात रस्त्याच्या दुतर्फा काही दुकाने आहेत. या व्यावसायिकांनी रस्त्यावर पाच फुटांर्पयत पक्के ओटे व त्यावर शेड उभारल्याने हा रस्ता अतिशय अरूंद झाला होता. हे पक्के बांधकामाचे आटे व शेड जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले. 

फुले मार्केटमध्ये गुप्ता शेव भांडार या विक्रेत्याने मोठी जागा व्यापली होती. या विक्रेत्याचे अतिक्रमण काढण्यात आले तसेच अन्य गाळेधारकांनी रस्त्यावर शेडची उभारणी केली असल्याचे लक्षात आल्याने ते काढून घ्यावे अन्यथा मनपाकडून जेसीबी लावून ते काढले जाईल असा इशारा देण्यात आला. 
काटय़ाफाईल भागात दोन भंगार विक्रेत्यांनी मोठी जागा व्यापली होती. ही दोन्ही दुकाने आज काढण्यात आली. सायंकाळर्पयत भंगार विक्रेता या ठिकाणचे सामान हलवत होता. तर काही भाजी विक्रेत्यांची भाजीही या परिसरातून जप्त करण्यात आली. 
अतिक्रमणांवर कारवाई दरम्यान पोलन पेठ , शिवाजी रोड वरील श्रीराम प्लास्टीक व शिव प्लास्टीक येथे 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या  प्लास्टीक पिशव्या विक्री होत असल्याचे लक्षात आले. तसेच   चहाचे प्लास्टिकचे कपही आढळून आले. असे जवळपास 176  किलो साहित्य या ठिकाणाहून  जप्त करण्यात आले.  या व्यावसायिकांना जागीच   प्रत्येकी पाच हजाराचा  दंड करण्यात येऊन वसुली करण्यात आली. 

Web Title: Hammer on massive encroachments in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.