चहुत्रे गावचा पाणीटंचाई प्रश्न न सुटल्यास हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:12 AM2021-06-17T04:12:11+5:302021-06-17T04:12:11+5:30

या गावाचा पाण्याचा प्रश्न जर सोडविला नाही तर पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा यावेळी ...

Handa Morcha if water scarcity problem of Chahutre village is not solved | चहुत्रे गावचा पाणीटंचाई प्रश्न न सुटल्यास हंडा मोर्चा

चहुत्रे गावचा पाणीटंचाई प्रश्न न सुटल्यास हंडा मोर्चा

Next

या गावाचा पाण्याचा प्रश्न जर सोडविला नाही तर पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

चहुत्रे, ता. पारोळा येथे तब्बल दोन महिन्यांपासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी लहान मुले, महिला यांना वणवण भटकंती करावी लागत आहे, तर काहींना विकत पाणी घ्यावे लागत आहे.

तीन टाक्या, पाणी मुबलक तरीही टंचाई

गावासाठी पाण्याच्या तीन टाक्या असून, विहिरींमध्ये मुबलक पाणी उपलब्ध आहे. सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत यांच्या गलथान कारभारामुळे गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महिला तालुकाध्यक्ष शोभा पाटील यांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांना याविषयी जाब विचारला असता मोटार खराब आहे. विहिरीत पाणी नाही. पाईप फुटला आहे. अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. गटविकास अधिकारी यांनी याबाबत दखल घेऊन चहुत्रे गावाचा पाणी प्रश्न मार्गी लावावा, यासाठी चहुत्रे गावातील महिला, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने एकत्र येत निवेदन दिले. येणाऱ्या ३-४ दिवसात निवेदनाची दखल न घेतल्यास पंचायत समिती, पारोळा येथे हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा महिला तालुकाध्यक्ष शोभा पाटील यांनी दिला आहे.

यावेळी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष महेश पाटील, विभागीय अध्यक्ष जितेंद्र वानखेडे, विभागीय सचिव भाऊसाहेब सोनवणे, महिला तालुकाध्यक्ष शोभा पाटील, महिला शहराध्यक्ष ॲड. स्वाती शिंदे, पार्वतीबाई खैरनार, भरती भिल, दगुबाई भिल, अनिता वारुळे, मंगल गायकवाड, राधा भिल, कोकीलाबाई भिल, योगिता गायकवाड, शारदा भिल उपस्थित होते.

Web Title: Handa Morcha if water scarcity problem of Chahutre village is not solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.