लॉक डाऊन मध्ये सरसावल मदतीचे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 08:24 PM2020-03-25T20:24:16+5:302020-03-25T20:25:20+5:30

संपर्क फाऊंडेशनच्या माध्यमातून घरपोच मिळणार औषधी, किराणा : आॅनलाईन बुकींग केल्यानंतर घरपोच मिळणार सेवा

Hands-on help in lock down | लॉक डाऊन मध्ये सरसावल मदतीचे हात

लॉक डाऊन मध्ये सरसावल मदतीचे हात

Next

जळगाव : ‘कोरोना’ च्या पार्श्वभूमीवर नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तुंसाठी नागरिकांचे हाल होण्याची भिती ओळखून शहरातील काही सामाजिक संस्था आपआपल्या परीनेमदत करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत.

भारत विकास परिषद अंतर्गत संपर्क फाऊंडेशनच्यावतीने गरजू वयोवृद्ध पेशंटसाठी होम नर्सिंग सुविधा तसेच पेशंटसाठी अटेंडंटची सुविधा देण्यात येत असून, संचारबंदी आहे तो पर्यंत ज्या लोकांना अत्यावश्यक असलेले औषधी व किराणा ही घरपोच आणून देण्याची व्यवस्था संपर्क फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. यासाठी संपर्क फाऊंडेशनने हेल्पलाईन क्रमांक (८४३२२७८६२४ ) जाहीर केला आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर नागरिक आवश्यक असलेली औषधी, किराणा हे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या दरम्यान नोंद करु शकणार आहे. हे सर्व नोंद केलेले साहित्य दुसऱ्या दिवशी दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत नागरिकांना घरपोच मिळणार आहे. कोणताही डीलीव्हरीची रक्कम ग्राहकांना देण्याची गरज नाही. भारत विकास परिषदेच्या संपर्क फाऊंडेशनच्या माध्यमातून या उपक्रमात पुरुषोत्तम न्याती, प्रसन्न मांडे, तुषार तोतला, उज्ज्वल चौधरी, उमेश पाटील, चेतन दहाड, राजीव नारखेडे, रवींंद्र लढ्ढा, चेतना नन्नवरे, डॉ. योगेश पाटील, धनंजय खडके, विशाल चोरडीया व प्रशांत महाजन यांचा समावेश आहे. नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांकावर नोंदणी करुन जास्तीत जास्त या सेवेचा लाभ घ्यावा. जेणेकरुन गर्दीत जाणे सहज टाळणे शक्य होईल. असे संपर्क फाऊंडेशनच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

गोर-गरिबांना नि:शुल्क जेवण
दररोज ४०० गोर-गरिब व मजूर व्यक्तींना जेवणाचे नि:शुल्क पाकीट हे संचारबंदी काळात संपर्क फाऊंडेशनच्यावतीने वितरीत केले जाणार आहे.

Web Title: Hands-on help in lock down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.