हनुमान जयंतीदिनी माकडाचा शॉक लागून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2017 01:53 PM2017-04-11T13:53:51+5:302017-04-11T13:53:51+5:30
शिरसोली येथील बसस्थानक परिसरात मंगळवारी सकाळी माकडाचा विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने दुदैवी मृत्यू झाला.
Next
शिरसोली ग्रामस्थांनी केले विधीवत अंत्यसंस्कार
शिरसोली,दि.11- येथील बसस्थानक परिसरात मंगळवारी सकाळी माकडाचा विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने दुदैवी मृत्यू झाला. हनुमान जयंतीच्या दिवशी माकडाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी विधिवत अंत्यसंस्कार करीत भूतदया जोपासली.
मंगळवारी सकाळी शिरसोलीतील एस.टी.स्टॅण्डच्या शेजारी असलेल्या रोहित्राला माकडाचा स्पर्श झाल्याने ते जागीच ठार झाले. यामुळे रोहित्राला आग लागली. याबाबत कनिष्ठ अभियंता मुकेश ठाकरे यांना माहिती देण्यात आली. गावातील इलेक्ट्रीशिअन योगेश बारी यांनी रोहित्रावरील डीओ काढून आग विझविली. यामुळे आजूबाजूच्या घरांचे होणारे संभाव्य नुकसान टळले.
दरम्यान, हनुमान जयंतीच्या दिवशी माकडाचा मृत्यू झाल्याने हनुमान मंदिर परिसरातील रहिवासी कन्हैया ताडे, संतोष ताडे, भैय्या शिंपी, अमोल काटोले, विनोद ताडे, मुयर खलसे, चेतन चौधरी यांनी मृत माकडाची विधीवत पुजा केली. गावात अंत्ययात्रा काढून दफनविधी करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)