वरणगावात हनुमान मंदिर कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 05:45 PM2020-08-22T17:45:38+5:302020-08-22T17:46:57+5:30

येथील प्रसिद्ध हनुमान मंदिर शुक्रवारी रात्री अचानक कोसळले.

Hanuman temple collapsed in Varangaon | वरणगावात हनुमान मंदिर कोसळले

वरणगावात हनुमान मंदिर कोसळले

googlenewsNext
ठळक मुद्देनागेश्वर रस्त्यावरील रात्रीच घटनामूर्ती सहीसलामतपावसामुळे कोसळल्याचा अंदाजशेतात बांधले होते ४०-५० वर्षांपूर्वी मंदिर




बाळू चव्हाण
वरणगाव, ता.भुसावळ : येथील बोदवड रस्त्यावर नागेश्वर मंदिराच्या आधी दर्शन देणारे प्रसिद्ध हनुमान मंदिर शुक्रवारी रात्री अचानक कोसळले. या घटनेत मंदिरातील मूर्ती मात्र सुरक्षित आहे. येथे व परिसरात रात्रभर पाऊस सुरू होता. यामुळे हे मंदिर कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
याबाबत प्रत्यक्षदर्र्शींनी दिलेली माहिती अशी की, बोदवड रस्त्यावर सुप्रसिद्ध नागेश्वर मंदिराच्या आधी जग्गू माळी यांच्या शेतात हनुमानाचे मोठे मंदिर होते. या मंदिराचे बांधकाम ४० ते ४५ वर्षांपूर्वीचे होते. या मंदिरात दररोज भक्तांची वर्दळ असते. परंतु लॉकडाऊनमुळे मंदिराचे चॅनल गेट दिवसभर बंद असते.
या मंदिरावर काही वर्षांपूर्वी जयलहरी मौनी बाबा पुजारी होते. या मंदिरात श्रद्धेने मन:पूर्वक केलेली कामना पूर्ण होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. येथे बरेचसे मानसुद्धा दिले जातात. असे पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले नवसाला पावणारे श्रीरामभक्त हनुमानाचे मंदिर शुक्रवारी रात्री कोसळले. मूर्ती मात्र जशीची तशी उभी आहे. ते पाहण्यासाठी भाविकांची सकाळपासून झुंबड उडाली होती.

Web Title: Hanuman temple collapsed in Varangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.