हणुमंतखेडे सीमच्या विद्यार्थिनीने बनविला शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:20 AM2021-08-27T04:20:39+5:302021-08-27T04:20:39+5:30

एरंडोल : सध्याच्या स्थितीत प्रत्येकाने स्वत:ला आधुनिक बनविणे काळाची गरज आहे. या गोष्टीला अवसरून शेतकऱ्यांनीदेखील आधुनिक राहावे ...

Hanumantakhede seam student built a cold room based on zero energy | हणुमंतखेडे सीमच्या विद्यार्थिनीने बनविला शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष

हणुमंतखेडे सीमच्या विद्यार्थिनीने बनविला शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष

Next

एरंडोल : सध्याच्या स्थितीत प्रत्येकाने स्वत:ला आधुनिक बनविणे काळाची गरज आहे. या गोष्टीला अवसरून शेतकऱ्यांनीदेखील आधुनिक राहावे म्हणून ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत क. का. वाघ. कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी तथा तालुक्यातील हणुमंतखेडे सीम येथील कृषिकन्या ऐश्वर्या संजय पाटील हिने शेतकऱ्यांनी पिकवलेला माल साठवून ठेवता यावा व चांगला भाव मिळेल त्या वेळेस विकता यावा यासाठी वीट, बांबू, पाईप, खाली पोती याचा वापर करून शीतकक्ष कसे निर्माण करता येईल याचे उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे. या शीतकक्षाचे वातावरण बाहेरील वातावरणापेक्षा १० ते १५ सेल्सिअसने कमी असते. म्हणून शेतकरी आपल्या मालाची साठवणूक जास्त वेळ करू शकतो.

फळांची साठवण कमी तापमान आणि योग्य आर्द्रतेमध्ये केल्यास साठवण कालावधी वाढविणे शक्य आहे. शीतकक्षात साठवणुकीमुळे शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला फळे जास्त काळ टिकतात.

या शीतकक्षात कोणत्याही ऊर्जेचा वापर होत नाही. शीतकक्षाची उभारणी कमी खर्चात व सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यात होते. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशकुमार हाडोळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. परमेश्वरी पवार, प्रा. सुनील बैरागी व प्रा. नीलेश गडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Hanumantakhede seam student built a cold room based on zero energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.