हनुमान मंदिरामुळे परिसराला पडले हनुमानवाडी नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2017 03:00 PM2017-04-11T15:00:04+5:302017-04-11T16:30:41+5:30
चाळीसगाव शहरातील हनुमानवाडी भागात 100 वर्षापूर्वीचे जागृत हनुमान मंदिर असून हे मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे.
>चाळीसगाव,दि.11- शहरातील हनुमानवाडी भागात 100 वर्षापूर्वीचे जागृत हनुमान मंदिर असून हे मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे. दररोज भाविकांची दर्शनासाठी मंदिरात गर्दी दिसते. याठिकाणी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल पाहायला मिळते.
11 रोजी हनुमान जयंती असून त्यानिमित्त शंभर वर्षपूर्वीच्या या मंदिराला रंगरंगोटी करूय तोरण, लायटींग व सजावटीचे कामही केले आहे. नवसाला पावणारा मारुती अशी ख्याती असल्याने अनेक भाविक येथे श्रध्देने येतात. त्यामुळे या मंदिराची जागृत स्थान म्हणून ख्याती आहे.
शेकडो वर्षापूर्वी हे मंदिर उभारण्यात आले त्यावेळी या परिसरात नागरी वस्ती नव्हती. कालांतराने मंदिर परिसरात मोठय़ा प्रमाणात चारही बाजूने नागरी वस्ती झाली आहे. या मंदिरामुळेच या भागाला हनुमानवाडी असे नाव पडले आणि आता हा परिसर शहराचा मध्यवर्ती असा भाग आहे. माजी कायदा मंत्री हरी विनायक पारसकर, शिवदुलारे शुक्ल, बुधेसिंग राजपूत व इतरांनी या मंदिराची उभारणी साधारणपणे 1920 च्या आसपास केली. सुरुवातीला या मंदिराची जबाबदारी दत्तात्रय बंडू पाठक यांचेकडे पारसकर यांनी दिली. नंतर 1955 ते 2008 या कालावधीत त्यांचे पुत्र मुरलीधर दत्तात्रय पाठक यांनी पुजारी म्हणून कामकाज पाहिले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र प्रशांत मुरलीधर पाठक हे काम पाहात आहेत. सद्यस्थितीत तिस:या पिढीकडून या मंदिराची देखभाल होत आहे. मंदिर परिसरात वर्षभर विविध कार्यक्रम उत्साहात पार पडतात.
रामनवमी, हनुमान जयंती दरवर्षी साजरी केली जाते. कार्तिक महिन्यात महिनाभर काकडारती होते तर कार्तिक पौर्णिमेला दिवसभर रामनामाचा जप आणि भंडा:याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. मंदिर आवारात महादेवाचेही स्थान असून येथे पूर्वी पिंड स्थापन करण्यत आली होती. तीन वर्षापूर्वी महादेव व गणेशाची मूर्ती स्थापित करण्यात आली. तसेच बाजूलाच जय बजरंग व्यायामशाळाही उभारली आहे. (छायाचित्र: संजय सोनार)