कट्ट्यावरचा वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 04:16 PM2019-11-19T16:16:50+5:302019-11-19T16:17:08+5:30

कट्ट्यावर ज्येष्ठांनी एकत्रित येणे आगळा अनुभव असतो. कट्ट्यावरचा वाढदिवस नेमका कसा असतो याविषयी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत जळगाव येथील आर.आर. हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय पाठक...

Happy Birthday | कट्ट्यावरचा वाढदिवस

कट्ट्यावरचा वाढदिवस

Next

कट्टा म्हटला की काहींना आपले कॉलेजचे दिवस आठवतात, तर काहींना निवृत्तीनंतरचे, पण तुम्ही कट्टा मेंबर असला तर तुमचा कट्टा हा ठरलेला. ठरलेल्या जागी ठरलेल्या वेळी तुम्ही तिथे जाणार. आता बहिणाबाई उद्यान, काव्य रत्नावली चौक हे खास कट्टे. वेळेनुसार सदस्य बदलणार. आता काव्य रत्नावली चौकाचेच पाहाना. सायंकाळी पाचपासून सातपर्र्यंत सेवानिवृत्तांनी चारही बाजू भरलेल्या असतात. त्यानंतर कॉलेजियन्स, कुटुंबवत्सल यांची गर्दी सुरू होते. रात्री पाय मोकळे करायला म्हणून आपापल्या बाईकवर येणाऱ्यांची गर्दी. ही उशिरापर्यंत असते.
या कट्ट्यावर येऊन बसणाऱ्यांची कळत न कळत अनेकांची ओळख होते. परिचयांची देवाणघेवाण होते. दररोजच्या भेटीतून हळूहळू आपलेपणा जाणवू लागतो. प्रसन्नपणे हास्यविनोद होऊ लागतात. तासभर वेळ कसा जातो ते कळतही नाही. दिवसांमागून दिवस गेल्यावर ही कट्ट्यावरची मैत्री अधिक घट्ट होते. मग कुणाचा तरी वाढदिवस येतो.
लहानपण आठवत कुणीतरी आपल्या खिशातून चॉकलेट काढून कट्ट्यावरच्या मित्रांना देतो तर कुणी चहा बिस्कीटे देऊन वाढदिवस साजरा करतो़ या चहा बिस्किटाचा आनंद घेत असताना कट्ट्यावरचा माझा वाढदिवस अमूक तारखेचा बरं का चहाला इथे नक्की या सांगताना त्याचा चेहरा आनंदीत झालेला असतो. काव्य रत्नावली चौकात सकाळी येणाºयांमध्ये एक जोशी काका आहेत. वय फक्त ८८ अनेक वर्षांपासून सकाळी येथे येऊन बसणारे. आता त्यांना चालवत नसल्याने त्यांचा एक मुलगा बाईकवर आणून सोडतो तर दुसरा तासाभराने घरी घेऊन जातो.
दुसरे चौबे काका कट्ट्यावर ओढीने मित्रांना भेटायला रिक्षाने येतात. जोशी असो वा चौबे, कट्ट्यावर आल्याचा, सर्वांना भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहºयावर वेगळाच असतो. गेल्या आठवड्यात सकाळी तेथे असणाºयांनी एकत्र येत जोशी काकांचा वाढदिवस अंगावर प्रेमाची शाल घालत साजरा केला. त्यांच्या मुलांनी हजर असलेल्या सर्वांना चहा दिला आणि वडिलांचे मित्र म्हणून हातरूमाल दिला. अनेक ओळखी-अनोळखी होते. पण कट्ट्यामुळे आपलेपणाने बांधले गेले होते.
बहिणाबाई उद्यानात असाच एक कट्टा आहे. स्टेट बँकेच्या निवृत्तांचा न चुकता सायंकाळी तासभर जमतात. हास्य विनोद होतात आणि नंतर प्रत्येक जण आपापल्या घरी परततो. या ग्रुपचे सदस्य वाढदिवसाला आपल्या कट्टा मेंबर्सना अगत्याने बोलावून जेवण देतात .
शेवटी कुणीही काय दिले पेक्षा किती प्रेमाने दिले हे महत्त्वाचे असते. या निवृत्तांच्या घरी वाढदिवस कसा साजरा होतो हे माहीत नसले तरी कट्ट्यावरच्या वाढदिवसाला या कट्टा मेंबर्सच्या जीवनात वेगळाच आनंद देऊन जातो , तो त्यांना सुखावून जातो हे मात्र खरे.
-विजय पाठक, जळगाव

Web Title: Happy Birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.