बोदवडकर समस्यांनी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 07:18 PM2020-09-18T19:18:54+5:302020-09-18T19:19:01+5:30
गटारी, रस्ते आदी मूलभूत सुविधांचाही अभाव
गोपाल व्यास।
बोदवड : येथील नगरपंचायत सन ६ मे २०१६ ला उदयास आली व आज या नगरपंचायतला चार वर्षे चार महिने नऊ दिवस पूर्ण झाले, परंतु आजही पाहिजे त्या सुविधा शहरवासियांना मिळालेल्या नाहीत. अनेक समस्यांशी सामना करावा लागत असून कॉलनीवासीतर जणू वनवासच भोगत आहेत.
बोदवड नगरपंचायतला मिळणाºया एकूण उत्पन्ना पैकी पन्नास टक्के उत्पन्न शहरातील कॉलनी परिसरातून मिळतो. परंतु या कॉलनी परिसरातून अर्ध्यावर कर मिळूनही त्यादृष्टीने त्यांना सुविधा सोई मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बोदवड शहरात ग्राम पंचायत काळ ापासून साकला कॉलनी, विद्यानगर, जय माता दी नगर, सरस्वती नगर आदी कॉलन्या होऊन आज जवळपास वीस वर्षे झालीत परंतु आज ही येथील रस्त्याच्या, गटारीच्या, तसेच स्वच्छेच्या समस्या कायम आहेत.
जय मातादी नगरच्या ग्रामीण रुग्णालय परिसरात तर रस्त्यावर झाडेझुडपी वाढली असून अजूनही काही नागरिक या रस्त्यावर शौचाला जात असल्याने दुर्गंधी पसरलेली असते.
शहरातील हिदायात नगर ला जोडणाºया कुरेशी वाडा ते बाहेर पेट रस्त्यावर चालण ही कठीण होते, ठिकठिकाणी खड्डे ाय रस्ता आहे, तर रूप नगर मध्ये रस्त्याची वाट बिकट झाली आहे. येथील रहिवशांन नगरपंचायतला गत महिन्यात निवेदन ही दिले होते मात्र कार्यवाही झाली नाही.