लसीकरण स्थळी नागरिकांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:18 AM2021-09-22T04:18:34+5:302021-09-22T04:18:34+5:30
गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून एन.ई.एस. हायस्कूलमध्ये सुरू असलेले लसीकरण केंद्र बंद झाल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून बाजूला जीर्ण ...
गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून एन.ई.एस. हायस्कूलमध्ये सुरू असलेले लसीकरण केंद्र बंद झाल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून बाजूला जीर्ण झालेल्या जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळेच्या इमारतीत लसीकरण सुरू करण्यात आले आहे. ज्या खोलीत हे लसीकरण सुरू आहे त्या ठिकाणी पंखा, लाइट, पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्या खोलीत रजिस्ट्रेशन करणारे, लस देणारे व लस घेणाऱ्यांची गर्दी झाल्याने गुदमरल्यासारखे होते. यात लसीकरण करणाऱ्या परिचारिकांची खूप दमछाक होत आहे.
या जीर्ण झालेल्या इमारतीचे कौल केव्हा खाली पडतील, अशी परिस्थिती येथे आहे. लसीकरणासाठी येणारे नागरिक मुठीत जीव धरून रांगेत उभे असतात. सर्व सोयी- सुविधांयुक्त अशी इमारत लसीकरणासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
छाया : पारोळा येथे लसीकरणासाठी उन्हात रांगेत उभे असलेले नागरिक.