घराचे कर्ज फेडण्यासाठी ७० लाख रुपये आणावे म्हणून विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:15 AM2021-05-24T04:15:13+5:302021-05-24T04:15:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून ७० लाख रुपये आणावे, या मागणीसाठी भूषण कॉलनीतील माहेरवाशिणीचा छळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून ७० लाख रुपये आणावे, या मागणीसाठी भूषण कॉलनीतील माहेरवाशिणीचा छळ केल्याप्रकरणी पती संजीव गोपे, सासरे बिरांची गोपे, सासू सुवर्णलता गोपे व पूजा गोपे (सर्व रा. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूषण कॉलनीतील माहेर असलेल्या अंभिरा गोपे यांचे पुण्यातील रहाटणी येथील सासर आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून ७० लाख रुपये आणावे, अशी मागणी करीत सासरच्यांकडून विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ केला जात होता. तसेच मारहाण व शिवीगाळ केली जात होती. अखेर सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्या माहेरी परतल्या. शनिवारी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठत त्यांनी सासरच्यांविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
===========
नवीन घरासाठी माहेरून पैसे आणावे म्हणून छळ
जळगाव : नवीन घरासाठी सबसिडी लागणार आहे, त्यामुळे ते पैसे माहेरून आणावे यासाठी ममुराबाद येथील माहेर असलेल्या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी शारीरिक, मानसिक छळ केला. याप्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूजा सुरेश शिरसाठ यांचे ममुराबाद येथील माहेर आहे, तर सुरत येथील सासर आहे. दरम्यान, नवीन घरासाठी सबसिडी लागणार आहे. यामुळे माहेरून पैसे आणावे असा विवाहितेकडे पती सुरेश शिरसाठ, सासरे इगन शिरसाठ तसेच सासू आशाबाई यांनी तगादा लावत मारहाण केली. तसेच वेळोवेळी शारीरिक, मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून पूजा या माहेरी परतल्या. शनिवारी तालुका पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.