कानळदा रस्त्यावर विवाहितेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:16 AM2021-04-22T04:16:09+5:302021-04-22T04:16:09+5:30
जळगाव : कानळदा रस्त्यावर पायी चालत जाणाऱ्या ५० वर्षीय विवाहितेचा शाहरुख खाटीक (रा. लक्ष्मीनगर) याने ओढणी ओढून विनयभंग ...
जळगाव : कानळदा रस्त्यावर पायी चालत जाणाऱ्या ५० वर्षीय विवाहितेचा शाहरुख खाटीक (रा. लक्ष्मीनगर) याने ओढणी ओढून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी बुधवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहिता १९ एप्रिल रोजी ९ वाजेच्या सुमारास आईच्या घरी पायी जात असताना शाहरुख खाटीक याने समोरून येत असताना त्यांच्या खांद्याला धक्का दिला व ओढणी ओढून मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याचा जाब विचारला असता संशयित आरोपी शाहरुखने विवाहितेला अश्लील शिवीगाळ केली. दोन्ही मुले व भाऊ धावत आल्याचे पाहून शाहरुखने पळ काढला. विवाहितेच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे करीत आहेत.