रोख पाच लाख व तीन लाखाच्या दागिन्यांसाठी विवाहितेला दिले चटके

By विजय.सैतवाल | Published: October 13, 2023 03:35 PM2023-10-13T15:35:29+5:302023-10-13T15:35:32+5:30

फिर्याद विवाहितेने शनिपेठ पोलिस ठाण्यात दिली

Harassment of married woman for dowry money in Jalgaon, complaint filed in police station | रोख पाच लाख व तीन लाखाच्या दागिन्यांसाठी विवाहितेला दिले चटके

रोख पाच लाख व तीन लाखाच्या दागिन्यांसाठी विवाहितेला दिले चटके

जळगाव : माहेरुन रोख पाच लाख रुपये व तीन लाखाचे दागिने न आणल्याने दिक्षा अमित पंडित (२९) या विवाहितेला सासरच्या मंडळींनी मारहाण करण्यासह चटके दिले. या प्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिपेठेतील माहेर असलेल्या दिक्षा यांचा विवाह नाशिक येथील अमित रामदेव पंडित यांच्याशी झाला. त्यानंतर काही दिवसांनी या विवाहितेचा पैसे व दागिन्यांसाठी शारीरिक व मानसिक छळ केला जाऊ लागला. माहेरुन पाच लाख रुपये रोख व तीन लाखाचे दागिने आणावे, म्हणून तिला मारहाण करण्यासह स्वयंपाक घरातील साहित्याने चटके देऊन जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. तशी फिर्याद विवाहितेने शनिपेठ पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पती अमित पंडित, सासू शारदा रामदेव पंडित, दीर, नणंद यांच्यासह चुलत सासरे प्रकाश भगवानदास पंडित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश पाटील करीत आहेत.

Web Title: Harassment of married woman for dowry money in Jalgaon, complaint filed in police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.