कष्टाने उभारलेला संसार मोडू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:12 AM2021-07-19T04:12:39+5:302021-07-19T04:12:39+5:30
पारोळा येथे रविवारी खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने व विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी आमदार चिमणराव पाटील यांच्या मागणीने ...
पारोळा येथे रविवारी खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने व विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी आमदार चिमणराव पाटील यांच्या मागणीने मतदारसंघासाठी वातानुकूलित रुग्णवाहिका भेट दिली आहे. त्याचा शुभारंभ आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अमोल पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, शेतकरी संघ माजी अध्यक्ष चतुर बाबूराव पाटील, पोपटराव नाईक, जिल्हा परिषद सदस्य रोहिदास पाटील, पंचायत समिती सदस्य जितेंद्र पाटील, एरंडोल तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, पारोळा तालुकाप्रमुख प्रा. आर. बी. पाटील, शहरप्रमुख अशोक मराठे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मधुकर पाटील, प्रा. बी. एन. पाटील, प्रेमानंद पाटील, दीपक पिंगळे, शेतकरी संघ अध्यक्ष अरुण पाटील, सखाराम चौधरी, संघ संचालक डॉ. राजेंद्र पाटील, भिकन महाजन, चेतन पाटील, एरंडोल माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, देवगाव सरपंच समीर पाटील, राजू कासार, डी. बी. पाटील, प्रकाश नामदेव वाणी, दाजभू पाटील, समाधान मगर, जीजबराव पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते.
आमदार पाटील पुढे म्हणाले की, आपणदेखील ४० वर्षांत संघटनेची मजबूत बांधणी केली आहे आणि आपल्या डोळ्यादेखत उभारलेल्या संघटनेला खिळखिळी करण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर ते आपण होऊ देणार नाही. या सर्व गोष्टींसाठी आपण मजबूत आहोत. चांगल्या भूमिकेमुळे माझे कधी कधी नुकसान होते. म्हणून आता आपण कुजक्या गोष्टी सोडून विकासाच्या ओघात येऊ, असे ते म्हणाले.
रविवारी सकाळी महालक्ष्मी पेट्रोलपंप येथील आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण पार पडले. सूत्रसंचालन प्रा. आर. बी. पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवसेना युवासेना आदींनी परिश्रम घेतले रुग्णवाहिकेत पारोळा येथील ईश्वर ठाकूर या चालकाची नियुक्ती करण्यात आली आहे.