हार्ड इम्युनिटीचा अंदाज चुकला, भुसावळात रुग्णवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:15 AM2021-04-25T04:15:59+5:302021-04-25T04:15:59+5:30
जळगावात : तिसऱ्या सिरो सर्वेक्षणात भुसावळ शहरात सर्वाधिक ३९. ९ टक्के लोकांमध्ये ॲन्टीबॉडीज आढळून आल्या होत्या. त्यामुळे भुसावळात ...
जळगावात : तिसऱ्या सिरो सर्वेक्षणात भुसावळ शहरात सर्वाधिक ३९. ९ टक्के लोकांमध्ये ॲन्टीबॉडीज आढळून आल्या होत्या. त्यामुळे भुसावळात कोरोनाविरोधात सर्वाधिक हार्ड इम्युनिटी विकसित झाल्याचा हा अंदाज होता. मात्र, त्यानंतरही भुसावळ मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ समोर आली होती. एकत्रित या तिसऱ्या सिरो सर्व्हेच्या अहवालांना आरोग्य यंत्रणेलाच बुचकळ्यात टाकले होते. दुसऱ्या सर्व्हेच्या अहवाला अधिक लोकांमध्ये ॲन्टीबॉडी आढळून आल्या होत्या. मात्र, तीन महिन्यांनी यात केवळ ३ टक्क्यांनी वाढ झाली होती. याचा अर्थ तज्ज्ञांचा ५० टक्क्यांचा अंदाज या ठिकाणी खोटा ठरला हेाता. तिसऱ्या सर्व्हेच्या अहवालानुसार २८. ३४ टक्के लोकांमध्ये ॲन्टीबॉडी आढळून आल्या होत्या. यात ४२७ पैकी १२१ पॉझिटिव्ह आढळले होते.
भुसावळ ३९.९ टक्के, रुग्ण १०१४३
धरणगाव ३१ टक्के, रुग्ण ४७५९
जळगाव २७ टक्के, रुग्ण २९४०४