हरि या हो आता मंदिरी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 04:30 PM2019-10-24T16:30:12+5:302019-10-24T16:34:28+5:30
हरि या हो आता मंदिरी... चाले हें शरीर कोणाचिये सत्ते ! कोण बोलवितें हरीविण !!१!!, देखवी ऐकवी एक नारायण ...
हरि या हो आता मंदिरी...
चाले हें शरीर कोणाचिये सत्ते !
कोण बोलवितें हरीविण !!१!!, देखवी ऐकवी एक नारायण !, तयाचें भजन चुकों नये !!
हे शरीर कोणाच्या सत्तेने चालते? देवाच्या सत्ते शिवाय काहीही चालत नाही. चालणारा- बोलावणारा तोच भगवान परमात्मा, विठ्ठल आहे. देव सर्व ठिकाणी भरलेला आहे. तुज आहे तुज पाशी परी तु जागा विसरलासी! तुझ्या हदयमंदिरी देव ठासून भरलेला आहे. त्यांची जाणीव आपल्याला झाली नाही. म्हणून हरी या हो आता मंदिरी दुसरे नाही येथे कोणी...हदयात देव आहे पण त्या देवाला आपलेसे करून घेण्यासाठी घर रिकामे झाले पाहिजे. कारण आपुला देह मलीन आहे... काम क्रोध बंदीखानी. तुका म्हणे दिले दोन्ही मी माझ्या चित्तातून ठरवले आहे की, पंढरपूर हे माझे माहेर आहे. पांडूरंग माझा मायबाप कृपावंत आहे. त्याला मी हदयात बसविले आह. हदयात कोंडून घेण्यासाठी आपण काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार दूर करून देवाला हदयात स्थान दिले पाहिजे! कारण त्यांच्याशिवाय आपल्याला कोणी नाही. तो आहे म्हणून आपण आहोत त्यांच्या सत्तेवर हे सारे जग चालले आहे! देवाचा कॅमेरा चालू आहे. आपण पाप करतो का पुण्य करतो हे त्या कॅमेरा मध्ये सर्व शूटींग भरले जाते आणि ते कॅसेट आपल्याला जाता -जाता मिळणार आहे. तो परमात्मा सर्व जाणतो त्यालाच काही शिकवायची गरज नाही.
- मनोज महाराज कुलकर्णी, पिंप्राळा.