एटीएम फोडण्यात हरियाणाची टोळी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:00 PM2019-07-26T12:00:50+5:302019-07-26T12:01:06+5:30

सातत्याने घटना घडूनही बॅँका सतर्क नाही

Haryana gang raiding ATMs? | एटीएम फोडण्यात हरियाणाची टोळी?

एटीएम फोडण्यात हरियाणाची टोळी?

Next

सुनील पाटील
जळगाव : जिल्ह्यात या महिन्यात एटीएम फोडण्याच्या दोन घटना घडल्या. या दोन्ही घटना घडल्यानंतरही बॅँकांनी खबरदारी म्हणून कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. बहुतांश बॅँकेच्या एटीएमला सुरक्षा रक्षक नसल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या पाहणीत आढळून आले. काही बॅँकांनी एजन्सीशी करार केला आहे. पैसे अपलोड करण्यापासून तर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित एजन्सीची असल्याने तेथे बॅँकांचा संबंध येत नाही. दरम्यान, एटीएम फोडण्याच्या गुन्ह्यांमध्ये हरियाणाची टोळी सक्रीय असल्याची माहिती समोर आली आहे.
जळगाव शहरातील काशिनाथ लॉज चौकात एचडीएफसी बॅँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला.
यंत्रात छेडछाड करताच मुंबईच्या मुख्य कार्यालयात सायरन वाजल्याने हा प्रयत्न असफल झाला. त्याला आठवडा होत नाही, तोच कुºहे पानाचे, ता.भुसावळ येथे गॅस कटरने एटीएम यंत्र कापून त्यातील सहा लाखाची रोकड लांबविण्यात आली.
या दोन्ही घटना बॅँका व पोलिसांसाठी आव्हान ठरल्या आहेत.
काशिनाथ चौकातील घटनेबाबत तर बॅँकेने तक्रारही दिलेली नाही. या घटनांनंतरही बॅँका सतर्क झालेल्या नसल्याचे दिसून येत आहे.
स्टेट बॅँकेच्या एटीएममध्ये सुरक्षा नाही
स्टेट बॅँकेचे जिल्ह्यात ८९ एटीएम आहेत. त्यापैकी एकाही एटीएमवर सुरक्षा रक्षक नाहीत. अ‍ॅक्सीस बॅँकेचेही जिल्ह्यात १६ एटीएम आहेत. त्यांनी देखील सुरक्षा रक्षक नेमलेले नाहीत, मात्र एजन्सीशी करार झालेला असल्याने त्यांनीच सुरक्षा रक्षक नेमल्याचा दावा बॅँकेचे स्थानिक अधिकारी निलेश तेंडूलवाडीकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केला.
एचडीएफसी बॅँकेच्या बहुतांश एटीएममध्येही सुरक्षा रक्षक नसल्याचे दिसून आले. अप्रिय घटना टाळण्यासाठी बँकांनी दक्षता घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
अ‍ॅक्सिस बॅँकेच्या एटीएममध्ये वाजतो सायरन
अ‍ॅक्सिस बॅँकेच्या शहरातील काही एटीएममध्ये दर पाच मिनिटांनी सायरनचा आवाज होत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, सायरनची यंत्रणा अद्ययावत केली आहे का? याबाबत बॅँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी नकार दिला. काही तरी तांत्रिक बिघाड झाला असावा, आम्ही त्याची पडताळणी करतो असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
हरियाणात एटीएम निर्मिती आणि स्क्रॅपच्या कंपन्या एटीएम तोडणे, फोडणे व लांबविणे याबाबत एक धक्कादायक माहिती व्हायरल होत आहे. हरियाणा राज्यातील मेवात व नूह या दोन जिल्ह्यातील असंख्य कामगार एटीएम निर्मिती करणाºया कंपन्यांमध्ये कामाला आहेत. नोएडानजीक अनेक कंपन्या एटीएमची निर्मिती करतात. तसेच एटीएम स्क्रॅप करण्याचे कामही याच मजुरांकडून केले जाते. त्यामुळे एटीएम यंत्र व त्याचे स्पेअरपार्ट याबाबत या कामगारांना बºयापैकी माहिती आहे.
१० ते १२ टायरचा ट्रक आणि कारचा वापर कोणत्या एटीएममध्ये एका बाजुला कॉँक्रीट भरलेले आहे आणि कोणत्या एटीएममध्ये कॉँक्रीट नाही याची जाणीव या कामगारांना आहे. कॉँक्रीट नसलेले एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने कापणे व जमिनीतून काढणे सहज शक्य आहे. या दोन्ही जिल्ह्यातील दोनशेच्यावर कामगार एटीएम गॅस कटरने कापणे व काढून लांबविण्याचे काम करतात. १० ते १२ टायरचा ट्रक व महागड्या कार सोबत घेऊन इतर राज्यात ही टोळी फिरते. ट्रकमध्ये एटीएम फोडण्याचे सर्व साहित्य ठेवले जाते. मोबाईलमुळे पकडले जाण्याची भीती असल्याने ही टोळी मोबाईलचा वापर करीत नाही. सोबत आणलेला ट्रक ४० ते ७० किलोमीटर अंतरावर थांबविण्यात येतो. रात्री १ ते ३ या वेळेतच एटीएम फोडण्याचे काम केले जाते.
स्थानिक पोलिसांकडून बाहेरील पोलिसांना मदत नाही एटीएमच्या गुन्ह्यांबाबत तपासासाठी येणाºया बाहेरील राज्याच्या पोलिसांना स्थानिक पोलिसांकडून मदत केली जात नाही. एखाद्या पथकाने गावात जावून अटकेची कारवाई करण्याची हिंमत केलीच तर थेट गोळीबार केला जातो. त्यानंतर पोलिसांवर खोटे आरोपात अडकविले जाते. दरम्यान, हरियाणा राज्यातील या टोळीची माहिती सध्या पोलिसांच्या अनेक राज्यांमधील गृपमध्ये व्हायरल झालेली आहे.
बंगळुरु येथे २०१६ मध्ये सुरक्षा रक्षकाशी संबंधित घटना घडली होती. तेव्हापासून रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशाने स्टेट बॅँकेच्या एटीएमची सुरक्षा काढण्यात आली. सध्याच्या घटना पाहता आयबीए या संघटनेने एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत रिझर्व्ह बॅँकेकडे पाठपुरावा सुरु केला आहे.
-अशोक सोनुने, सहायक महाव्यवस्थापक, स्टेट बॅँक

Web Title: Haryana gang raiding ATMs?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव