‘हाश्श, हुश्श, गझलसदृष अन् रसभरीत वर्णन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 04:54 PM2018-02-13T16:54:11+5:302018-02-13T16:55:31+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘हसु भाषिते’ या सदरात लिहीत आहेत साहित्यिक प्रा.अनिल सोनार.

'Hashish, Hushh, Ghazalsasya and Rasbhari Descarna' | ‘हाश्श, हुश्श, गझलसदृष अन् रसभरीत वर्णन’

‘हाश्श, हुश्श, गझलसदृष अन् रसभरीत वर्णन’

Next

दैनिक ‘जनानुनय’च्या कार्यालयातील झाडून सारा कर्मचारी वर्ग हातातली कामं टाकून, त्यांच्या लेखकाच्या अवस्थेचं चाललेलं रसभरीत वर्णन ऐकायला सहाय्यक संपादकांभोवती जमला होता. ‘गझलनुमा रचना’ ‘गझलसद्दश्य रचना’ अशा, अस्सल गझल रचनांचं श्राद्ध घालणाºया रचना वाचून वाचून वैतागलेले, साहित्य पुरवणी विभागाचे प्रमुख तर, एखादा पापनाशक मंत्र श्रद्धेने ऐकावा, तसे कान देऊन ऐकत होते. सहाय्यक संपादक त्यांच्या लेखकावर कोसळलेल्या संकटाचे निवेदन करत म्हणाले,
असाच एका हॉटेलात
एकटाच होतो बसलो,
एक तरुण हसला,
मग मीही थोडंसं हसलो.
धीटपणे वही काढत म्हणाला,
‘सर इथे दाखवू?’
मी म्हणालो, ‘अरे, इथे नको,
नंतर सावकाश बघू’.
नंतर पेट्रोलपंपावर
त्याने मला गाठलंच,
पेट्रोल भरताभरता
‘शेरा’ंचं आभाळ फाटलंच
त्या दिवसापासून स्कूटर
थरथर कापत पळते,
यंत्र असले तरी तिला
बलात्कारातले कळते.
मॅकेनिक म्हणाला,ल्लगाडीत
भलतंच काही घडतंय,
बंद केल्यावरही इंजिन
बघाना कसं धडधडतंय.
परवा एका स्रेह्याच्या
प्रेतयात्रेला होतो गेलो,
खांदा देताच तो पुटपुटला,
‘मी पूर्ण नाहीये हं मेलो.’
तिरडवरची त्याची मान
हळूच माझ्या कडे वाकली,
ताजी गझल ऐकवून मगच
त्याने मान टाकली.
पिंडाला कावळा शिवेना,
म्हणून पोरगा कावला,
‘गझलसंग्रह काढीन.’ म्हणताच
पिंडाला कावळा शिवला.
रानात कुठल्याही दगडाखालून
एकतरी विंचू निघतोच.
तसा प्रत्येक गल्लीमधे
एक गझलीया असतोच..
फाशीपेक्षा कठोर शिक्षा
जेव्हा अतिरेक्यांना देतात,
तेव्हा म्हणे फेसबुकवरच्या
गझला वाचायला देतात.
भिकार गझल रचनेला जो
भरभरून दाद देतो,
चित्रगुप्त म्हणे त्याची जागा
नरकात राखून ठेवतो.
जेवायला बसलो, घास घेणार,
तेवढ्यात फोन आला,
शब्दांच्या ऐवजी तिकडून गरम
लाव्हाच ओतला गेला.
म्हणाला, ‘माझ्या गझलांचे
आत्ताच प्रकाशन झाले,
सगळे वक्ते संग्रहाबद्दल
खूपच छान छान बोलले.
गझल सद्दश्य, गझलनुमा
म्हटलंय ना मी,
आता सांगा गझलीया म्हणून
कुठे कमी पडतोय मी?
तुम्हाला काव्यातलं कळत नाही,
एवढं मला कळलंय,
प्रकाशनापूर्वीच संग्रहाला
पहिलं बक्षीस मिळालंय (उत्तरार्ध)

Web Title: 'Hashish, Hushh, Ghazalsasya and Rasbhari Descarna'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.