हतनूर धरणाचा विसर्ग केला कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:16 AM2021-07-25T04:16:03+5:302021-07-25T04:16:03+5:30
जळगाव : दोन दिवसापूर्वी उघडण्यात आलेले हतनूर धरणाचे ४१ दरवाजे अजूनही उघडेच असून, धरणातून विसर्ग मात्र कमी करण्यात आला ...
जळगाव : दोन दिवसापूर्वी उघडण्यात आलेले हतनूर धरणाचे ४१ दरवाजे अजूनही उघडेच असून, धरणातून विसर्ग मात्र कमी करण्यात आला आहे. मध्य प्रदेश, विदर्भात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने धरणक्षेत्रात पाऊस कमी होत असल्याने आवक कमी झाल्याने विसर्ग कमी केला आहे.
हतनूर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने गुरुवारी धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आले होते. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवीत शुक्रवारी रात्री हा विसर्ग एक लाख ३३ हजार ८४३ क्युसेसपर्यंत पोहचला होता. त्यानंतर पाऊस कमी होत असल्याने विसर्ग कमी केला जात आहे. यात शनिवारी सकाळी सहा वाजता ८९ हजार ४८८ क्युसेस, दुपारी १२ वाजता ७२ हजार ५७२ क्युसेस, दुपारी तीन वाजता ६८ हजार १९३ क्युसेस व संध्याकाळी सहा वाजता ६३ हजार ३१९ क्युसेसवर हा विसर्ग आला.
हतनूर धरणाचा विसर्ग कमी केला असला तरी राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दक्षता घेतली जात आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह यंत्रणा सतर्क आहे.