सहा गावांसाठी हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन सुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:18 AM2021-05-25T04:18:15+5:302021-05-25T04:18:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ममुराबादसह परिसरातील पाच गावांना पाणीटंचाई उदभवू नये, यासाठी हतनूर धरणातून बिगर कृषक कामासाठी ...

Hatnur dam released water for six villages | सहा गावांसाठी हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन सुटले

सहा गावांसाठी हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन सुटले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ममुराबादसह परिसरातील पाच गावांना पाणीटंचाई उदभवू नये, यासाठी हतनूर धरणातून बिगर कृषक कामासाठी आवर्तन सोडण्यास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी मान्यता दिल्यानंतर सोमवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी हतनूर धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे २.९२ द.ल.घ.फू. बिगर सिंचन पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. यामुळे या गावांची पाणीटंचाईतून सुटका झाली असून त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

जळगाव तालुक्यातील ममुराबाद, विदगाव, आवाड, खापरखेडा, तुरखेडा आणि नांद्रा खुर्द या गावांना पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी या गावातील सरपंच व इतर ग्रामस्थांनी शनिवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन त्यांना हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी २.९२ द.ल.घ.फू. पाण्याचे आकस्मिक आरक्षण करून, हतनूर धरणातून हतनूर उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यास तातडीने मान्यता दिली व या गावांसाठी पाणी सोडण्याचे निर्देश सर्व संबंधित विभागास दिले होते.

पुरेसा कर्मचारी वर्ग निरीक्षणाकरीता उपलब्ध करून द्यावा...

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बिगरसिंचन पाणी वापर संस्थेने आवर्तन कालावधीत पाहणी पथक व वाहन निरीक्षणासाठी तयार ठेवावे. तसेच आवर्तन कालावधीत पुरेसा कर्मचारी वर्ग निरीक्षणाकरीता उपलब्ध करुन द्यावा. या अटींवर या गावांसाठी हतनूर उजव्या कालव्याद्वारे बिगर सिंचन पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहे. त्यानुसार सोमवारी हतनूर धरण विभागाने आवर्तन सोडले असून ग्रामस्थांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांचे आभार मानले आहे.

Web Title: Hatnur dam released water for six villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.