मंत्र्यांच्या नाराजीनंतर अतिक्रमणांवर हातोडा

By admin | Published: March 23, 2017 12:23 AM2017-03-23T00:23:19+5:302017-03-23T00:23:19+5:30

रेल्वे स्टेशनवरील घटना : गिरीश महाजन यांच्या कारचा दुचाकीला धक्का लागल्यावरून वाद

Hats on encroachment after ministers' resignation | मंत्र्यांच्या नाराजीनंतर अतिक्रमणांवर हातोडा

मंत्र्यांच्या नाराजीनंतर अतिक्रमणांवर हातोडा

Next

जळगाव : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कारचा धक्का लागल्याच्या कारणावरुन मंगळवारी रात्री काही जणांनी महाजन यांच्या कारचालकाशी वाद घातला. तर काही मद्यपींनी कपडे काढून रस्त्यावर धिंगाणा केला होता. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून वाद घालणा:यासह रात्री उशिरार्पयत व्यवसाय करणा:यांविरुध्द कारवाई केली. रस्त्यात लावलेल्या 16 दुचाकी जप्त करुन त्यांच्याविरुध्द दंडात्मक कारवाई केली. यावरून बुधवारी महापलिकेकडूनही सायंकाळी स्टेशन रोड परिसरात अतिक्रमण विरोधात  कारवाई करण्यात आली. यावेळीही पोलीस बंदोबस्त होता.
मंत्री गिरीश महाजन हे मुंबईला जाण्यासाठी रात्री साडे अकरा वाजता रेल्वे स्थानकावर आले होते. तेव्हा पुतळ्याजवळून वळण घेत असताना त्यांच्या कारचा एका दुचाकीला धक्का लागला. त्यावरून दुचाकीस्वाराने चालकाशी वाद घातला. त्यावर चालकाने नरमाईची भूमिका घेतली. मंत्री असले म्हणून तुम्ही काहीही करणार का? असा प्रतिप्रश्न दुचाकीस्वाराने केला. यावरून  मंत्री महाजन यांनी थेट पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांना ही माहिती देऊन  कारवाईच्या सूचना दिल्या.
सुपेकर यांनी तत्काळ उपअधीक्षक सचिन सांगळे यांना घटनास्थळी रवाना केले. शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप ठाकूर, सहायक निरीक्षक दीपक गंधाले व कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रस्त्यात बेशिस्तपणे लावलेल्या 16 दुचाकी व हातगाडय़ा ताब्यात घेतल्या. प्रत्येकी 200 रुपये दंड आकारुन त्यांना सोडण्यात आले.



दुस:या दिवशी धडक कारवाई़़़ मनपा अतिक्रमण विभागातर्फे बुधवारी सायंकाळी पोलीस बंदोबस्तात स्टेशन रोडवरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. त्यात सुमारे 20 दुकानांचे अतिक्रमण तोडण्यात आले. तसेच पुढे आलेले शेड, फलक आदीचे अतिक्रमण काढण्यात आले. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा करीत उभ्या असलेल्या हॉकर्सच्या 4 लोटगाडय़ा, तसेच नागरिकांनी रस्त्यावरच उभ्याकेलेल्या 4 मोटारसायकल्स, 4 टेबल, 1 रॅक, शटर 1, तसेच पत्र्याचे शेड जप्त करण्यात आले.


मद्यपींनी घातला गोंधळ
 हा गोंधळ सुरु असताना काही मद्यपी कपडे काढून महाजन यांच्या कारच्या पुढे नाचत होते. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले होते. त्यामुळे स्टेशन परिसरात बराच वेळ गोंधळ सुरूहोता.

Web Title: Hats on encroachment after ministers' resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.