कारवाईच्या भीतीने हॉकर्सची ‘लपाछपी’

By admin | Published: February 18, 2017 12:29 AM2017-02-18T00:29:59+5:302017-02-18T00:29:59+5:30

फुले मार्केटमधील स्थिती : भंगार बाजार, चित्रा चौक व बी.जे.मार्केटमधील अतिक्रमण कधी हटविणार?

Hawker's 'False' fear of action | कारवाईच्या भीतीने हॉकर्सची ‘लपाछपी’

कारवाईच्या भीतीने हॉकर्सची ‘लपाछपी’

Next

जळगाव : मनपा कर्मचा:यांची निवडणूक कामातून मुक्तता झाली असून शुक्रवारपासून अतिक्रमणधारक हॉकर्सवर मनपाच्या अतिक्रमण निमरूलन विभागाकडून कारवाई होईल, या भीतीने फुले मार्केटमधील अतिक्रमणधारक हॉकर्सनी दिवसभर दुकाने थाटलीच नाही. दरम्यान, अतिक्रमण निमरूलन विभागाचे पथक आज दिवसभर तळ ठोकून होते.
इतर मार्केटची अतिक्रमणेही काढा
 माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी शुक्रवारी मनपा आयुक्तांकडे अतिक्रमणांबाबत तक्रार केली आहे. 12 रोजी केलेल्या कारवाईनंतर फुले मार्केटमध्ये प्रवेश करणे सुकर झाले होते. वाहनधारकांना वाहनतळार्पयत गाडय़ा नेता येत होत्या. त्यामुळे समोरील रस्तेही मोकळे दिसत होते. मात्र मनपा कर्मचारी नसल्याने दोन दिवस पुन्हा अतिक्रमणे झाली. मात्र आता कारवाई सत्र हाती घ्यावे अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. फुले मार्केटप्रमाणे बी.जे. मार्केट, अजिंठा चौफुलीकडील भंगार बाजार, चित्रा चौक यासह सर्व व्यापारी संकुलांच्या भोवती असलेली अतिक्रमणे काढली जावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. तसेच याप्रश्नी चर्चा करण्यासाठी वेळ मिळावा, अशी मागणीही त्यांनी या निवेदनात केली आहे.
रविवारपासून लपाछपी
फुले मार्केटमधील वाढती अतिक्रमणे, रस्त्यावरून जात असताना येत असलेल्या अडचणी, तसेच महिलांना होत असलेल्या त्रासाबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेऊन मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांनी या भागातील अतिक्रमणे काढण्याचे आदेश केले होते.
गेल्या रविवारी सुटी असताना मनपा अतिक्रमण निमरूलन विभागाचे पथक या ठिकाणी पोहोचले. मार्केटमध्ये व्यावसायिकांनी काही ठिकाणी लोखंडी पेटय़ा ठेवलेल्या होत्या, त्यादेखील जप्त करण्यात आल्या. त्यानंतर सोमवार व मंगळवार असे दोन दिवस या ठिकाणी अतिक्रमणे नव्हती. त्यामुळे अनेक वर्षानंतर मार्केटने मोकळा श्वास घेतल्याचे दृश्य या भागात पाहायला मिळाले.
बुधवारी पुन्हा अतिक्रमणे
बुधवारपासून मनपातील कर्मचा:यांवर जिल्हा परिषद निवडणुकीची जबाबदारी होती. त्यामुळे मनपातील जवळपास 400 कर्मचारी या जबाबदारीवर होते. ही संधी साधून दोन दिवस मार्केटमध्ये पुन्हा अतिक्रमणे झाली. कर्मचारी नसल्यामुळे कारवाई शक्य नसल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. मात्र आज मनपाचे कर्मचारी परतल्याने कारवाईच्या भीतीने हॉकर्सने या भागात गाडय़ा किंवा दुकाने लावली नाहीत.
मनपा अतिक्रमण विभागाचे पथक या ठिकाणी तळ ठोकून होते. नजीकच्या काही दुकानांमध्ये हॉकर्स आपले सामान ठेवत असतात. पथक बाजूला गेले की सामान बाहेर काढण्यात येते. असा लपाछपीचा खेळ येथे दिसून आला. शनिवार हा बाजाराचा दिवस असतो, त्यामुळे काय परिस्थिती राहते याकडे लक्ष लागून आहे. मनपाने अजिंठा चौफुली परिसरातील भंगार बाजार, बी.जे. मार्केट परिसरातील अतिक्रमण हटविण्याचीही मागणी होत आहे.
काव्यर}ावली चौकातील हॉकर्सना तंबी
काव्यर}ावली चौक ते महाबळ कॉलनीकडे जाणा:या रस्त्यावर 20 ते 22 खाद्यपदार्थाच्या गाडय़ा सायंकाळनंतर उभ्या असतात. या ठिकाणी सध्या डॉ.भवरलाल जैन थीम पार्कचे काम सुरू आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून लवकरच उद्घाटन सोहळा प्रस्तावित आहे. ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणी खाद्यपदार्थाच्या गाडय़ा लावू नयेत, अशा सूचना त्या ठिकाणच्या हॉकर्सना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा रस्ताही आता मोकळा होणार आहे. या भागातील हॉकर्स तसेच महाबळ रस्त्यावरील अतिक्रमणेही येत्या दोन दिवसात काढण्यात येणार आहेत.

Web Title: Hawker's 'False' fear of action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.