वकीलाचे बंद घर फोडून अडीच लाखाचा ऐवज लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 09:08 PM2020-07-09T21:08:43+5:302020-07-09T21:10:18+5:30

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे चोपडा तालुक्यातील मुळ गावी गेलेल्या आर.आर.पाटील या वकीलाचे बंद घर फोडून दागिने व रोकड मिळून अडीच लाखाच्यावर ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना गुरुवारी सकाळी आदर्श नगरात उघडकीस आली. वॉचमन इमारतीत दहा रुपये घेण्यासाठी आला असता हा प्रकार उघड झाला.याप्रकरणी उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

He broke into the lawyer's house and stole Rs 2.5 lakh | वकीलाचे बंद घर फोडून अडीच लाखाचा ऐवज लांबविला

वकीलाचे बंद घर फोडून अडीच लाखाचा ऐवज लांबविला

Next
ठळक मुद्देआदर्श नगरातील घटना वॉचमन पैसे घ्यायला आल्यावर उघड झाला प्रकार

जळगाव : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे चोपडा तालुक्यातील मुळ गावी गेलेल्या आर.आर.पाटील या वकीलाचे बंद घर फोडून दागिने व रोकड मिळून अडीच लाखाच्यावर ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना गुरुवारी सकाळी आदर्श नगरात उघडकीस आली. वॉचमन इमारतीत दहा रुपये घेण्यासाठी आला असता हा प्रकार उघड झाला.याप्रकरणी उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.
आदर्शनगरातीलउत्कर्ष हौसिंग सोसायटीमध्ये अ‍ॅड.आर.आर.पाटील हे पत्नीसह वास्तव्यास आहेत. जिल्हा कामगार न्यायालयात ते वकील म्हणून काम पाहतात.  शहरात  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.त्यामुळे अ‍ॅड. पाटील हे तीन महिन्यांपासून पत्नीसह त्यांच्या चोपडा तालुक्यातील खडगाव या मुळगावी गेलेले होते. अधूनमधून त्यांचे शहरात येणेजाणे होते.आदर्शनगरातील वॉचमन दर महिन्याला प्रत्येक कुटुंबाकडून १० रुपये वसूल करतो. हे पैसे गोळा करताना तो बुधवारी अ‍ॅड.पाटील यांच्याघराजवळ पोहचला असता अ‍ॅड. पाटील यांचे घर उघडे होते, मात्र वॉचमनने आवाज देऊनही घरातून कुणीही प्रतिसाद दिला नाही. वॉचनमच्या आवाजाने शेजारचे बाहेर आले. त्यांनी केलेल्या पाहणीत अ‍ॅड. पाटील यांचा घराच्या दरवाजा कोयंडा व कडी तुटलेली दिसली. घरात कपाटातील कपडे व इतर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. चोरीची खात्री झाल्यावर शेजारच्यांनी हा प्रकार अ‍ॅड. पाटील यांना कळविला. त्यांनी दुपारी जळगाव गाठले.  याबाबत रामानंदनगर पोलिसांना कळविले, त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर व सहकाºयांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला आहे. 

Web Title: He broke into the lawyer's house and stole Rs 2.5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.