चुलत भावाला फोन करून घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 06:55 PM2021-02-06T18:55:42+5:302021-02-06T18:56:15+5:30
चुलत भावाला फोन करून गळफास घेतल्याची घटना खापरखेडे येथे घडली.
ठळक मुद्देमाकडाच्या अंत्यविधीसाठी गेले असताना आला फोन.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : चुलत भावाला फोन करून गळफास घेतल्याची घटना ६ रोजी सकाळी ११.३० वाजता खापरखेडे येथे घडली.
खापरखेडे येथील हिरामण भाऊराव पाटील हे अंबारे येथे माकडाच्या अंत्यविधीसाठी गेले असताना त्यांना त्याचा चुलत भाऊ प्रेमराज शांताराम पाटील यांचा फोन आला की मी फाशी घेत आहे. अंत्यविधीचा बँड वाजत असल्याने त्यांना ऐकू आले नाही. मात्र अंत्यविधी आटोपल्यानंतर हंसराज पाटील व हिरामण पाटील यांनी अंबारे येथे शेतात जाऊन पाहिले असता प्रेमराज पाटील यांनी गळफास घेतला असल्याचे समजले. त्यांनतर मारवड पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे